वेंगुर्ले/ विवेक परब : ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म दिनानिमीत्त भाजपा तालुका कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच वेंगुर्ले शहरातील राणी लक्ष्मीबाई शाळा – कुबलवाडा येथे शालेय मुलींना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ वाटप करुन बालिका दिन साजरा करण्यात आला .
यावेळी महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता दामले, जिल्हा उपाध्यक्ष Adv .सुषमा खानोलकर , माजी नगराध्यक्षा डाॅ. पुजा कर्पे, नगरसेविका श्रेया मयेकर, महिला ता.सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर, अल्पसंख्याक सेलच्या हसीना बेन मकानदार, सैनिक पतसंस्थेच्या ज्योती देसाई तसेच शाळेच्या शिक्षीका व मुली उपस्थित होत्या.