24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सरस्वती लक्ष्मण पवार राज्यस्तरीय पहिला काव्य पुरस्कार दिशा पिंकी शेख यांच्या “कुरूप” ला जाहीर

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली / उमेश परब – सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठान तर्फे यावर्षी पासून दिला जाणारा पहिला सरस्वती लक्ष्मण पवार काव्य पुरस्कार – 2021 दिशा पिंकी शेख यांच्या कुरूप या काव्यसंग्रहास जाहीर झाला आहे. दिशा पिंकी शेख या श्रीरामपूर, अहमदनगर येथील असून साहित्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय योगदान आहे. कुरूप मधील काव्य हे दुःखाचे खरेखुरे हृदयद्रावक प्रकटीकरण आहे. तृतीयपंथी किंवा हिजडा हे समाजाचेच घटक असूनही ते नेहमीच दुर्लक्षित आणि वंचित राहिले आहेत. त्यांच्या जगण्याचं वास्तव प्रतिबिंब ज्यात उमटलं आहे अशा कुरूप ला हा पुरस्कार जाहीर करून तृतीयपंथीयांना समाजात माणूस म्हणून चांगली वागणूक मिळावी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा हा सदाशिव पवार स्मृती प्रतिष्ठान चा उद्देश आहे, असा मनोदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ श्री सतीश पवार यांनी व्यक्त केला.

रोख रक्कम रु. 10000 आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दि. 1 मार्च 2022 रोजी सदाशिव पवार गुरुजी यांच्या जयंतीदिनी उचल्याकार – लक्ष्मण गायकवाड यांच्या हस्ते आणि समाजसेवक श्री संदीप परब , लेखिका वैशाली पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली येथे समारंभ पुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्कार निवडी साठी डॉ. भा. वा. आठवले, वैशाली पंडित, डॉ. मिलिंद शेजवळ, प्रसाद कुलकर्णी आणि विजय शेट्टी या मान्यवरांचा सल्ला घेण्यात आला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली / उमेश परब - सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठान तर्फे यावर्षी पासून दिला जाणारा पहिला सरस्वती लक्ष्मण पवार काव्य पुरस्कार - 2021 दिशा पिंकी शेख यांच्या कुरूप या काव्यसंग्रहास जाहीर झाला आहे. दिशा पिंकी शेख या श्रीरामपूर, अहमदनगर येथील असून साहित्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय योगदान आहे. कुरूप मधील काव्य हे दुःखाचे खरेखुरे हृदयद्रावक प्रकटीकरण आहे. तृतीयपंथी किंवा हिजडा हे समाजाचेच घटक असूनही ते नेहमीच दुर्लक्षित आणि वंचित राहिले आहेत. त्यांच्या जगण्याचं वास्तव प्रतिबिंब ज्यात उमटलं आहे अशा कुरूप ला हा पुरस्कार जाहीर करून तृतीयपंथीयांना समाजात माणूस म्हणून चांगली वागणूक मिळावी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा हा सदाशिव पवार स्मृती प्रतिष्ठान चा उद्देश आहे, असा मनोदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ श्री सतीश पवार यांनी व्यक्त केला.

रोख रक्कम रु. 10000 आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दि. 1 मार्च 2022 रोजी सदाशिव पवार गुरुजी यांच्या जयंतीदिनी उचल्याकार - लक्ष्मण गायकवाड यांच्या हस्ते आणि समाजसेवक श्री संदीप परब , लेखिका वैशाली पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली येथे समारंभ पुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्कार निवडी साठी डॉ. भा. वा. आठवले, वैशाली पंडित, डॉ. मिलिंद शेजवळ, प्रसाद कुलकर्णी आणि विजय शेट्टी या मान्यवरांचा सल्ला घेण्यात आला.

error: Content is protected !!