सतिश सावंत पराभूत..!
कणकवली / उमेश परब :(सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ): विकास संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत विरुद्ध विठ्ठल देसाई अशी लढत होती. तर मतमोजणी दरम्यान दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडल्याने चिट्ठीद्वारे अखेर विठ्ठल देसाई विजयी झाल्याने सतीश सावंत यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपा गोटात जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळत आहे. तर सेनेच्या गोटात शांतता पसरली आहे. सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघात राजन तेली (भाजप)- पराभूत तर सुशांत नाईक (महावि. आघा.) विजयी झाले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलीचा पराभव झाला आहे. सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे बंधू असून विध्यमान नगरसेवक आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत सिद्धिविनायक सहकार पॅनल चे दिलीप मोहन रावराणे निवडून आले आहेत. दिलीप रावराणे यांना 11 मते मिळाली तर विरोधी उमेदवार दिगम्बर श्रीधर यांना यांना 9 मते मिळाली.दिलीप रावराणे यांच्या विजयाने वैभववाडी तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे.
उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ)