दिनविशेष २७ डिसेंबर
१५७१: जर्मन खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ योहान्स केप्लर यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १६३०)
१६५४: स्विस गणितज्ञ जेकब बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १७०५)
१७७३: इंग्लंडचे शास्त्रज्ञ, शोधक आणि राजकारणी जॉर्ज केली यांचा जन्म.
१७९७: उर्दू कवी मिर्झा गालिब यांचा आग्रा येथे जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १८६९)
१८२२: रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा जन्म. (मृत्यू : २८ सप्टेंबर १८९५)
१८९८: विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक आणि केंद्रीय कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांचा जन्म. (मृत्यू : १० एप्रिल १९६५)
१९२७: उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २०१२)
१९४४: हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी २००७)
१९६५: हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान यांचा जन्म.
१९८६: दोन वेळा वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन बनणारी जमैका ची धावपटू शैली एन फ्रेजर प्राईस यांचा जन्म.