मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण तालुक्यातील ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धा इयत्ता ५ वी ते ७ वी व इयत्ता ८ वी ते १० वी या दोन गटांमध्ये झाली. या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून स्पर्धकांनी उदंड प्रतिसाद दिला. स्पर्धेचे उद्घाटन रेवंडी सरपंच सौ. प्रिया कांबळी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. स्वागत आणि प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रतापराव खोत यांनी केले. मान्यवरांमधून रेवंडी गावच्या सरपंच सौ. प्रिया कांबळी, शालेय समितीचे अध्यक्ष श्री. किशोर नरे, स्पर्धेचे प्रायोजक श्री. श्यामसुंदर कदम आणि मालवण तालुका माजी सभापती श्री. उदय परब यांनी आपल्या मनोगतांमध्ये हस्ताक्षर व शुद्धलेखनाचे मराठी भाषा वृद्धीसाठी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी असलेले महत्त्व सांगितले. तसेच प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समितीचे खजिनदार श्री. शरद परब, शालेय समिती सदस्य श्री. राजेंद्र सुतार, स्पर्धा प्रमुख श्री. प्रवीण पारकर, प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, स्पर्धक आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -