बांदा /राकेश परब : मडूरे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार २० डिसेंबर रोजी साजरा होत आहे. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी देवीची पूजाअर्चा व अभिषेक होईल. त्यानंतर देवीची ओटी भरणे, नवस बोलणे – फेडणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल. रात्री पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -