बांदा /राकेश परब : निगुडे-सोनुर्ली या अरुंद असलेल्या रस्त्यावर मोठया प्रमाणात ओव्हरलोड खनिज वाहतूक होत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या अवैध वाहतुकीवर आळा घालण्यात यावा, अशी मागणी निगुडे सरपंच समीर गावडे यांनी सिंधुदुर्ग आरटीओचे अधिकारी नंदकिशोर काळे यांच्याकडे केली आहे. याबाबत लक्ष वेधण्यासाठी त्यांनी नुकतीच श्री. काळे यांची भेट घेतली. यावेळी अशा प्रकारे वाहतूक करणार्या संबधित डंपर चालकांना दुप्पट दंड आकारुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी खास भरारी पथक नेमण्यात आले आहे, असे श्री. काळे यांनी सांगितले. याबाबतची माहीती श्री. गावडे यांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. त्यात त्यांनी म्हटल्यानंतर सोनुर्ली,निगुडे आदी भागातून येणार्या डंपरमधून रात्री बारा ते सकाळी नऊ वाजेपर्यत विनापरवाना खनिज वाहतूक होते. त्यामुळे हा प्रकार रोखण्यात यावा, तसेच या मागे नेमके कोण आहे? याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -