सुमारे अडीच लाखांचा पैशासह मुद्देमाल लंपास
बांदा / राकेश परब : बांदा काळसेवाडी – सुतारवाडी येथील रोडवरील तुषार कानसे यांच्या माऊली इलेक्टिकल या दुकानात चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघड झाली आहे. भरवस्तीत असलेल्या या दुकानात चोरी झाल्याने बांद्यात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार कानसे यांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.