पोईप | ओंकार चव्हाण: हेदुळ ग्रामपंचायत येथे भगिरथ विकास प्रतिष्ठान, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक सिंधुदुर्ग ,जिल्हा मध्यवर्ती सह. बॅक जिल्हा सिंधुदुर्ग ,यांच्या संयुक्त विद्यमाने हेदुळ मधील स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या पदाधिकारी व सदस्याकरीता नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भगिरथ प्रतिष्ठान झाराप अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, सिंधुदुर्ग बॅंक शाखाधिकारी श्री. किशोर गोवेकर , जिल्हा प्रबधंक नाबार्ड सिधुदुर्ग श्री. अजय थुटे आणि सिंधुदुर्ग बॅंक कसाल शाखाधिकारी या सर्वांनी बॅंक कर्ज व ठेव योजना तसेच विमा योजना डिजिटल इंडिया महिला सशक्तीकरण या विषयी डॉ प्रसाद देवधर उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले अशा विविध विषयांवरती महिलांना मार्गदर्शन केले. सरपंच श्री नंदू गावडे, उपसरपंच सौ दर्शना पुजारे, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती प्रियंका कदम सर्व उपस्थितांचे हेदुळ ग्रामसेवेक एम एस पिळणकर यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.