सोळा डिसेंबरपासून दत्त मठात अनेक अध्यात्मिक कार्यक्रमांचे झालेय आयोजन.
सोहळ्यातील कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेण्याचे श्री अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबार ट्रस्टच्या वतीने झाले सात्विक आवाहन.
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीतील सांगुळवाडीत श्री दत्त जयंती निमित्त दत्त मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दत्त जन्म सोहळ्यानिमित्त तीन दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबार ट्रस्ट सांगुळवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
दत्त जयंती सोहळ्याला सोळा डिसेंबर पासून प्रारंभ होणार आहे. दिनांक १६ आणि १७ डिसेंबर असे दोन दिवस धार्मिक विधी होणार आहेत. या दोन्ही दिवशी सकाळी ८.३० वा. पुजा पाठ, दुपारी १.२० वा. महाआरती, दु. १.३०वा महाप्रसाद, रात्री ८ वा. महाआरती व रात्री ८.३० वा. नंतर संगीत व वारकरी भजने होणार आहेत. शनिवार दि. १८ रोजी सकाळी ८.३० वा. पुजापाठ, सकाळी १०.३० दत्तयाग होमहवन, दु. १.२० महाआरती, दु. १.३० महाप्रसाद, सायं. ५.१५ ला दत्तजन्म व्याख्यान, सायं. दत्त जन्म उत्सव, रात्री ८.३० महाआरती, रात्री ९ वा. पालखी मिरवणूक काढली जाणार आहे..
या सोहळ्यातील एक वैशिष्ट्य म्हणजे रात्री १० वा. जोगेश्वरी येथील बुवा प्रतिक रावराणे विरुद्ध डोंबिवली मधील बुवा संजय पवार यांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी भजनाचा रंगतदार सामना होत आहे.
श्री अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबार ट्रस्ट सांगुळवाडी यांच्यावतीने सदर माहिती देण्यात आली आहे. या पारंपारिक सोहळ्याकडे अवघी सांगुळवाडी व दत्तभक्त उत्सुक असल्याचे श्रद्धात्मक चित्र सध्या वैभववाडीतील व सांगुळवाडीत दिसत आहे.