28.4 C
Mālvan
Friday, May 16, 2025
IMG-20240531-WA0007
ADVT Shrikant Sawant

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा हीरक महोत्सव समारोप सोहळा २६ एप्रिल रोजी.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण : कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ, मालवण संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य महाविद्यालयाचा हीरक महोत्सव समारोप सोहळा शनिवार, दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाचे उद्घाटन मा. खासदार नारायणराव राणे, माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. दैनिक तरुण भारतचे संस्थापक, लोकमान्य मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक आणि कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. किरण ठाकूर या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. आमदार नितेश राणे, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री आणि पालकमंत्री, जिल्हा सिंधुदुर्ग, तसेच आमदार डॉ निलेश राणे, आमदार दीपकभाई केसरकर, आमदार ॲड. निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, व उपाध्यक्ष अतुल काळसेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख देवदत्त उर्फ दत्ता सामंत, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब मुळीक, मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू अजय भामरे, उच्च शिक्षण सहसंचालक पनवेल विजय नारखेडे, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य युवराज लखमराजे भोसले, कमांडर राजीव कुबल, सीएसटेक एआय कंपनीचे सीईओ प्रशांत कामत यांची उपस्थिती लाभणार आहे.

याचबरोबर ’58 महाराष्ट्र बटालियन’ कर्नल दीपक दयाल, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे, मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

माजी विद्यार्थ्यांसाठी खास आयोजित केलेल्या फनी गेम्स, अस्मिता अंक व छायाचित्रे प्रदर्शन यांचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार आहे.

त्यानंतर महाविद्यालयाचे १९६५ पासून ते आजतागायतचे सर्व विद्यापीठ प्रतिनिधी UR, जनरल सेक्रेटरी GS, विद्यार्थिनी प्रतिनिधी LR, सेवानिवृत्त प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान सकाळी नऊ ते दहा या वेळेत विशेष सन्मान कक्षामध्ये होणार आहे.

त्यानंतर १० वाजता माननीय खासदार नारायणराव राणे यांच्या हस्ते महाविद्यालयात नव्याने तयार करण्यात आलेल्या बास्केटबॉल मैदानाचे उद्घाटन संपन्न होणार आहे. तसेच महाविद्यालयाच्या नूतन विस्तारित नामफलकाचे अनावरण डॉक्टर किरण ठाकूर यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या समारोप सोहळ्यामध्ये महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षांमध्ये विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान मुख्य अतिथींच्या हस्ते केला जाणार आहे.

दुपार नंतरच्या सत्रात 3.30 वाजता महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. माजी विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. तसेच माजी विद्यार्थ्यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या दिवसभराच्या भव्य कार्यक्रमासाठी “मालवण आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिक, सर्व आजी माजी विद्यार्थी, हितचिंतक, पालक वर्ग, महाविद्यालयाशी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटक, जिल्ह्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, सामाजिक संस्था पदाधिकारी, यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे”असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवराम ठाकूर, हीरक महोत्सव समन्वयक डॉक्टर सुमेधा नाईक, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव चंद्रशेखर कुशे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर आणि कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण : कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ, मालवण संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य महाविद्यालयाचा हीरक महोत्सव समारोप सोहळा शनिवार, दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाचे उद्घाटन मा. खासदार नारायणराव राणे, माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. दैनिक तरुण भारतचे संस्थापक, लोकमान्य मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक आणि कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. किरण ठाकूर या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. आमदार नितेश राणे, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री आणि पालकमंत्री, जिल्हा सिंधुदुर्ग, तसेच आमदार डॉ निलेश राणे, आमदार दीपकभाई केसरकर, आमदार ॲड. निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, व उपाध्यक्ष अतुल काळसेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख देवदत्त उर्फ दत्ता सामंत, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब मुळीक, मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू अजय भामरे, उच्च शिक्षण सहसंचालक पनवेल विजय नारखेडे, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य युवराज लखमराजे भोसले, कमांडर राजीव कुबल, सीएसटेक एआय कंपनीचे सीईओ प्रशांत कामत यांची उपस्थिती लाभणार आहे.

याचबरोबर '58 महाराष्ट्र बटालियन' कर्नल दीपक दयाल, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे, मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

माजी विद्यार्थ्यांसाठी खास आयोजित केलेल्या फनी गेम्स, अस्मिता अंक व छायाचित्रे प्रदर्शन यांचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार आहे.

त्यानंतर महाविद्यालयाचे १९६५ पासून ते आजतागायतचे सर्व विद्यापीठ प्रतिनिधी UR, जनरल सेक्रेटरी GS, विद्यार्थिनी प्रतिनिधी LR, सेवानिवृत्त प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान सकाळी नऊ ते दहा या वेळेत विशेष सन्मान कक्षामध्ये होणार आहे.

त्यानंतर १० वाजता माननीय खासदार नारायणराव राणे यांच्या हस्ते महाविद्यालयात नव्याने तयार करण्यात आलेल्या बास्केटबॉल मैदानाचे उद्घाटन संपन्न होणार आहे. तसेच महाविद्यालयाच्या नूतन विस्तारित नामफलकाचे अनावरण डॉक्टर किरण ठाकूर यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या समारोप सोहळ्यामध्ये महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षांमध्ये विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान मुख्य अतिथींच्या हस्ते केला जाणार आहे.

दुपार नंतरच्या सत्रात 3.30 वाजता महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. माजी विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. तसेच माजी विद्यार्थ्यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या दिवसभराच्या भव्य कार्यक्रमासाठी "मालवण आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिक, सर्व आजी माजी विद्यार्थी, हितचिंतक, पालक वर्ग, महाविद्यालयाशी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटक, जिल्ह्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, सामाजिक संस्था पदाधिकारी, यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे"असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवराम ठाकूर, हीरक महोत्सव समन्वयक डॉक्टर सुमेधा नाईक, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव चंद्रशेखर कुशे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर आणि कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

error: Content is protected !!