पहलगाम मधल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तीव्र संताप व्यक्त आणि दहशतवाद्यांच्या कठोर शिक्षेची मागणी.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण भरड नाका येथे नागरिकांनी एकत्र येऊन, आज २४ एप्रिल २०२५ रोजी, काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून संताप व्यक्त केला. हा भ्याड हल्ला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला असून दहशतवाद्याना पकडून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यानी २७ पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या निषेधार्थ तीव्र संताप व्यक्त करुन या हल्ल्यात मृत पावलेल्या दुर्दैवी पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानचा झेंडा जाळून व पाकिस्तान विरोधात तीव्र घोषणाबाजी करून आपला संताप व्यक्त केला. यावेळी भारताचा राष्ट्रध्वज व भगवा झेंडा फडकविण्यात आला.
यावेळी भाऊ सामंत, विलास हडकर, ऍड. समीर गवाणकर, डॉ. पंकज दिघे, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, बाबा मोंडकर, आपा लुडबे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, श्रीराज बादेकर, गणेश चव्हाण, प्रसाद हळदणकर, शिल्पा खोत, पूजा करलकर, अन्वेषा आचरेकर, अंजना सामंत, महिमा मयेकर, राणी पराडकर, सौ. तनुजा चव्हाण, महेश मांजरेकर, किसन मांजरेकर, बबन परुळेकर, ललित चव्हाण, सिद्धेश मांजरेकर, ऋत्विक सामंत, आबा हडकर, परशुराम पाटकर, नितेश पेडणेकर, मंदार आजगावकर, संदीप भोजने, दशरथ कवटकर तसेच अनेक हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.
यावेळी भारत माता की जय, जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या आणि ‘जिसको चाहिए पाकिस्तान उसको भेजो कब्रस्तान’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.
सौजन्य : मालवण ब्यूरो