25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

केंद्रीय मंत्री नारायण राणे ​२६​ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात

- Advertisement -
- Advertisement -

सिंधुदुर्ग जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मुंबई ते सिंधुदुर्ग नारायण राणे यांच्या झंझावती दौरा जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मुंबई ते सिंधुदुर्ग नारायण राणे यांच्या झंझावती दौरा

केंद्रीय मंत्री झाल्यानंतर राणेंची सिंधुदुर्गात प्रथमच होणार दमदार एंट्री

कणकवली / उमेश परब : केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. त्‍यांचा दौरा हा जन आशीर्वाद यात्रा च्या माध्यमातून मुंबई ते सिंधुदुर्ग असा जाहीर करण्यात आला आहे. 19 ते 26 ऑगस्ट असा सात दिवसाचा हा दौरा असून, जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे हे कार्यकर्ते व जनतेच्या गाठीभेटी घेत केंद्रीय मंत्री झाल्यानंतर 26 ऑगस्ट रोजी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. 19 ऑगस्ट रोजी नारायण राणे सकाळी 10 वाजता मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दाखल होणार आहेत. ते रात्री जुहू येथे निवास्थानी थांबल्यानंतर 20 ऑगस्ट रोजी मुंबई उपनगरात ही जन आशीर्वाद यात्रा दाखल होणार आहे. त्यानंतर 21 ऑगस्ट रोजी वसई-विरार येथे ही जन आशीर्वाद यात्रा दाखल होणार असून, तेथून 22 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनानिमित्त ही यात्रा स्थगित राहणार आहे. 23 ऑगस्ट रोजी दक्षिण रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर नारायण राणे व जन आशीर्वाद यात्रा रवाना होणार आहे. या दिवशी रात्री चिपळूण शहरात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुक्काम असणार आहे. तर 24 ऑगस्ट रोजी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या दिशेने यात्रा रवाना होणार आहे. त्यानंतर रात्री रत्नागिरी शहरात नारायण राणे व जनआशिर्वाद यात्रेतील मान्यवरांचा मुक्काम असणार आहे. 25 ऑगस्ट रोजी दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्या नंतर नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री दाखल होणार आहेत. व कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी त्यांचा मुक्काम असणार आहे. 26 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा असणार असून यावेळी या संपूर्ण दौर्‍यात भाजपाचे विविध स्तरातील पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेच्या गाठीभेटी केंद्रीय मंत्री नारायण राणे घेणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 26 ऑगस्ट रोजी या जन आशीर्वाद यात्रेचा समारोप होणार आहे. या संपूर्ण जन आशीर्वाद यात्रेच्या दौऱ्यात मुंबई ते सिंधुदुर्ग पर्यंत यात्रा प्रमुख म्हणून माजी आमदार तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांच्यावर पक्षांने जबाबदारी दिली आहे. तर या भाजपा महाराष्ट्र प्रदेश च्या जन आशीर्वाद यात्रे चे यात्रा संयोजक म्हणून आमदार संजय केळकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तर मुंबई ते सिंधुदुर्ग पर्यंत प्रत्येक विभाग निहाय दौरा सह प्रमुख म्हणून तेथील जिल्हाध्यक्ष, आमदार यांच्यावर जबाबदारी असणार आहे. अशी माहिती भाजपा कडून देण्यात आली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!