शिरगाव/संतोष साळसकर: देवगड तालुक्यातील ओंबळ-कझारवाडी येथील श्री वेलकेश्वर सेवा मंडळ व काझरवाडी हितवर्धक संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बुध. १५ डिसें. ते १९ डिसें. या कालावधीत दत्तजयंती उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्त कोरोनाचे सर्व नियम पाळून हा धार्मिक कार्यक्रम साजरा होणार आहे. बुध. दि. १५ डिसें. रोजी स.१० वा. घटस्थापना व अखंड हरिनामाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.११ वा. पालखी प्रदक्षिणा व देवस्थानाची भेट, ७ वा. आरती व पालखी प्रदक्षिणा,रात्री ९ वा. सुस्वर भजने,गुरू.१६ डिसें. रोजी स.१० वा. व सायं.७ वा. आरती, व पालखी प्रदक्षिणा,रात्री ९,३० वा. सुस्वर भजने व हरिपाठ, शुक्र.दि.१७ डिसें. रोजी स. १० वा. व सायं.७ वा. आरती, व पालखी प्रदक्षिणा,सायं.४.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा,रात्री ९.३० वा. बुवा.संतोष जोईल आणि बुवा अभिषेक शिरसाट यांचा २०-२० डबलबारी भजनाचा सामना होणार आहे.शनी.दि.१८डिसें. रोजी दु.१२ वा. श्री दत्तजन्मोत्सव व आरती, १२.३० वा. पालखी देवस्थान भेट,१.३० वा. महाप्रसाद,सायं. ७ वा. आरती व पालखी मिरवणूक,रात्रौ.९.३० वा. सुस्वर भजने,रवि.१९ डिसें. रोजी दु.१२ वा. महाप्रसाद, रात्री १० वा. शालेय बालनृत्य महोत्सव आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या सोहळ्याला सर्व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री वेलकेश्वर सेवा मंडळ व काझरवाडी हितवर्धक संघाने केले आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -