24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाला १७५ कोटी रुपये मंजूर – सतीश सावंत

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली / उमेश परब –
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी कणकवली व देवगड तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्प अंतर्गत धरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने धरण प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे पत्र जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांना देण्यात आले आहे. यात कणकवली तालुक्यातील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाला १७५ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती सतीश सावंत यांनी दिली आहे.
कोकणातील धरण प्रकल्पांसाठी निधी मिळावा अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदा विभागाचे मंत्री जयंत पाटील यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली होती. यात कणकवली मतदारसंघातील वैभववाडी कणकवली देवगड तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्प करण्यासाठी प्राधान्याने निधीची मागणी करण्यात आली होती. यानुसार पुढील आर्थिक वर्षासाठी प्रकल्प मंजूर करण्यात आलेला निधी असा तिलारी ७७ कोटी, कोर्ले सातंडी (ता. देवगड) १० कोटी, देवघर प्रकल्प (कुर्ली – घोणसारी, कणकवली) ५० कोटी, नरडवे मध्यम पाटबंघार (ता. कणकवली) १७५ कोटी, सरंबळ मध्यम पाटबंधारे प्रकल्प (ता. कुडाळ) १ कोटी, अरुण मध्यम पाटबंधारे प्रकल्प (ता. वैभववाडी) १५० कोटी, विर्डी धरण प्रकल्प (ता. दोडामार्ग ) एक कोटी रूपये मंजूर झाले आहेत. जिल्हातील लघु पाटबंधारे अंतर्गत धरण प्रकल्पाना निधी मिळाला आहे. यात कणकवली विधानसभा मतदार संघातील धरण प्रकल्पाना प्राधान्याने निधी वितरीत करण्यात आला आहे. कणकवली तालुक्यातील तरंदळे ल.पा प्रकल्पाला १० कोटी, वैभवावाडी तालुक्यातील नाधवडे धरण प्रकल्पाला ५ कोटी, कणकवली तालुक्याकील कळसुली देदोंवाडी ल. पा. धरण प्रकल्पाला १० कोटी, कणकवली तालुक्यातील तळेरे धरणाला १ कोटी, सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे धरणाला १ कोटी आणि कुडाळ तालुक्यातील निरूखे धरणाला ८ कोटीचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली आहे. जिल्हातील अन्य प्रकल्पाला निधी मंजूर केल्या जाणारा आहे. तसेच मोठ्या धरण प्रकल्पापेक्षा कणकवली मतदार संघात लधु धरण प्रकल्प उभारावेत जेणेकरून पुर्नवसनाचा प्रश्न निर्णिमान होणार नाही असा आपला प्रयत्न राहणार आहे. गावा गावात जो पर्यत शेतीला, फळबागायतील पाणी मिळत नाही तो पर्यत या भागाचा आर्थिक विकास होणार नाही असे ही सतीश सावंत यांनी सांगितले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली / उमेश परब -
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी कणकवली व देवगड तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्प अंतर्गत धरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने धरण प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे पत्र जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांना देण्यात आले आहे. यात कणकवली तालुक्यातील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाला १७५ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती सतीश सावंत यांनी दिली आहे.
कोकणातील धरण प्रकल्पांसाठी निधी मिळावा अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदा विभागाचे मंत्री जयंत पाटील यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली होती. यात कणकवली मतदारसंघातील वैभववाडी कणकवली देवगड तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्प करण्यासाठी प्राधान्याने निधीची मागणी करण्यात आली होती. यानुसार पुढील आर्थिक वर्षासाठी प्रकल्प मंजूर करण्यात आलेला निधी असा तिलारी ७७ कोटी, कोर्ले सातंडी (ता. देवगड) १० कोटी, देवघर प्रकल्प (कुर्ली - घोणसारी, कणकवली) ५० कोटी, नरडवे मध्यम पाटबंघार (ता. कणकवली) १७५ कोटी, सरंबळ मध्यम पाटबंधारे प्रकल्प (ता. कुडाळ) १ कोटी, अरुण मध्यम पाटबंधारे प्रकल्प (ता. वैभववाडी) १५० कोटी, विर्डी धरण प्रकल्प (ता. दोडामार्ग ) एक कोटी रूपये मंजूर झाले आहेत. जिल्हातील लघु पाटबंधारे अंतर्गत धरण प्रकल्पाना निधी मिळाला आहे. यात कणकवली विधानसभा मतदार संघातील धरण प्रकल्पाना प्राधान्याने निधी वितरीत करण्यात आला आहे. कणकवली तालुक्यातील तरंदळे ल.पा प्रकल्पाला १० कोटी, वैभवावाडी तालुक्यातील नाधवडे धरण प्रकल्पाला ५ कोटी, कणकवली तालुक्याकील कळसुली देदोंवाडी ल. पा. धरण प्रकल्पाला १० कोटी, कणकवली तालुक्यातील तळेरे धरणाला १ कोटी, सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे धरणाला १ कोटी आणि कुडाळ तालुक्यातील निरूखे धरणाला ८ कोटीचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली आहे. जिल्हातील अन्य प्रकल्पाला निधी मंजूर केल्या जाणारा आहे. तसेच मोठ्या धरण प्रकल्पापेक्षा कणकवली मतदार संघात लधु धरण प्रकल्प उभारावेत जेणेकरून पुर्नवसनाचा प्रश्न निर्णिमान होणार नाही असा आपला प्रयत्न राहणार आहे. गावा गावात जो पर्यत शेतीला, फळबागायतील पाणी मिळत नाही तो पर्यत या भागाचा आर्थिक विकास होणार नाही असे ही सतीश सावंत यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!