कणकवली / उमेश परब – सिंधुदुर्ग जिल्हा किशोर-किशोरी गट कबड्डी मैदानी निवड चाचणी शनिवार, ११ डिसेंबर रोजी दुपारी १ सायंकाळी ५ या वेळेत मालवण येथील भंडारी हायस्कूलच्या मैदानावर सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनने आयोजित केली आहे.या मैदानी चाचणीत निवड झालेला किशोर / किशोरी संघ परभणी येथे २० ते २२ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ३२ व्या किशोर / किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व करणार आहे. तर याच राज्य स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे.निवड चाचणीत सहभागी होऊ इच्छीणाऱ्या किशोर व किशोरी खेळाडूंसाठी वजन ५५ किलो व १६ वर्षांखालील (१ जानेवारी २००६ नंतर जन्मलेले) आवश्यक आहे. वयाच्या दाखल्याबाबत आधारकार्डची मूळ प्रत सोबत असणे बंधनकारक आहे. दहावी व बारावी परीक्षा दिलेल्या खेळाडूंनी परीक्षा हॉलची रंगीत छायांकित प्रत द्यावी, दहावी-बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याने परीक्षा अर्ज भरल्यानंतर प टेलिस्टची प्रत मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीनिशी द्यावी. माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या खेळाडूंसाठी शाळेचा यू-डायस नंबर व स्टुडंट आयडी असलेल्या बोनाफाईड व निर्गम उताऱ्यावर खेळाडूच्या फोटोवर मुख्याध्यापकाने अर्ध साक्षांकित केलेले असावे. आधारकार्डची रंगीत छायांकित प्रत पहिलीत प्रवेश घेतल्याचा निर्गम उतारा आणावा. या वयाच्या पुराव्याव्यतिरिक्त अन्य कोणताही पुरावा ग्राहय धरला जाणार नाही. यापैकी कोणताही एक दाखला व आधारकार्ड यांच्या मूळप्रती सोबत ठेवाव्यात. निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी सोबत जेवणाचा डबा, पाणी, प्रथमोपचार साहित्य, खेळाचा गणवेश ठेवावा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे कार्यवाह दिनेश चव्हाण (९४२२४३४२६५) किंवा फेडरेशनचे प्रशिक्षक नितीन आडकर यांच्याशी संपर्क साधावा.
महिला निवड चाचणी सावंतवाडीत महिला कबड्डी स्पर्धेसाठी संघ निवड चाचणी सावंतवाडी येथील आरपीडी हायस्कूलच्या मैदानावर रविवार, १२ डिसेंबर रोजी होणार आहे. महिला संघासाठी वजन ७५ किलोपर्यंत असणे आवश्यक आहे. यात सहभागी होण्यासाठी इच्छुक महिला खेळाडूंनी आलिस्का अल्मेडा (७४४७५१८७८८), दिनेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा. निवड झालेला संघ २२ ते २४ रोजी परभणीत होणाऱ्या राज्य स्पर्धेत सहभागी होणार आहे.