शिरगाव/संतोष साळसकर: कणकवली तालुक्यातील भरणी येथील श्री पावणाई देवी आणि श्री स्थानेश्वर मंदिरात रवि.५ डिसें. रोजी वार्षिक जत्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
यादिवशी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.रात्रौ उशिरा श्री पावणाई देवी मंदिरात श्री राठीवडेकर यांचा दशावतारी नाट्यप्रयोग तर श्री स्थानेश्वर मंदिरात श्री आप्पा दळवी यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.तसेच दोन्ही मंदिरात देवीचे ताट फिरवणे हा कार्यक्रम होणार आहे.त्याशिवाय श्री पावणाई मंदिरात माहेरवाशीयांच्या देवीच्या ओटी भरणे,नवस बोलणे, नवस फेडणे.आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.तरी या उत्सवाला सर्व भाविकांनी उपस्थित रहावे असे देवस्थान ट्रस्ट तर्फे आवाहन करण्यात आले आहे.