कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने पालघर जिल्ह्यातील अर्नाळा येथे ३३ वी क्योरोगी व ९ वी पुमसे राज्यस्तरीय तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धा २ ते ४ डिसेंबर या कालावधीत होत आहे. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघाची निवड करण्यात आली असून ते तायक्वांदो खेळाडू स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत. ही स्पर्धा क्योरोगी व पुमसे या दोन प्रकारात होणार आहे. सिंधुदुर्गचे खेळाडू या दोन्ही प्रकारात सहभागी होणार आहेत. या तायक्वांदो खेळाडूंच्या संघाच्या प्रशिक्षक म्हणून शेवंता नाईक व जयश्री कसालकर या काम पहाणार आहेत. तर संघ व्यवस्थापक म्हणून ऍड.अक्षय कुळकर्णी धुरा सांभाळणार आहेत .अर्नाळा येथील ग्रीन पॅराडाईझ रिसॉर्ट या नयनरम्य ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे स्थानिक आयोजक राजा मकवाना हे आहेत. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर ,महासचिव संदीप ओंबासे , सुभाष पाटील , प्रविण बोरसे , मिलिंद पाठारे ,भास्कर करकेरा , अविनाश बारगजे ,आबा झोडगे आदींच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत आहे. ३० जिल्ह्यातील ६५० खेळाडू ,प्रशिक्षक ,पंच , संघटना पदाधिकारी या स्पर्धेसाठी उपस्थित असणार आहेत . या स्पर्धेत सहभागी झालेला संघ पुढीलप्रमाणे आहे. मुले -सौरभ आचरेकर ,श्रेयस जाधव ,ओंकार सावंत ,अविराज खांडेकर ,अब्राहम बॅरेट ,हर्षल धुरी, संतोष पवार ,नागराज चौगुले.मुली – सेजल पाटील ,स्नेहा पाटील ,जान्हवी बाक्रे ,भाग्यश्री कसालकर ,नुरेमुबी अन्सारी ,अंगारकी राणे ,निलम सावंत यांचा समावेश आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे अध्यक्ष संदेश पारकर, उपाध्यक्षा राजश्री धुमाळे,सचिव व तायक्वांदो प्रशिक्षक भालचंद्र कुळकर्णी,कोषाध्यक्ष सुधीर राणे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -