ओरोस | प्रतिनिधी : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या वतीने ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत ओरोस फाटा येथील श्री ईच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालय येथे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्या. दीपक म्हालटकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी दिव्यांगांचे अधिकार, कायदे याबाबत न्या. म्हालटकर मार्गदर्शन करणार आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ मिसरड व सचिव विष्णू धावडे यांनी सांगितले.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -