
उद्योजक श्री. दत्ता सामंत यांच्या हस्ते उद्घाटन.
मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण चा वार्षिक स्नेहमेळावा १६ एप्रिल रोजी ओम गणेश मंगल कार्यालय कट्टा येथे दुपारी २ ते ५ या वेळेत होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन उद्योजक श्री. दत्ता सामंत यांच्या हस्ते होणार असून संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनकर शिरवलकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत अशी माहिती तालुका सचिव कृष्णा कालकुंद्रीकर यांनी दिली.

या मेळाव्याला विशेष अतिथी तहसीलदार वर्षा झालटे, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, गटशिक्षणाधिकारी संजय माने, विस्तार अधिकारी उदय दीक्षित, सौ. सविता परब, संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दया नाईक, राज्य संघटक किसन दुखंडे, शिक्षक नेते संजय वेतुरेकर, प्राथमिक शिक्षक भारती अध्यक्ष संतोष पाताडे, सरचिटणीस मंगेश खांबाळकर कार्याध्यक्ष विजय जाधव, मुख्य सल्लागार संतोष कोचरेकर, महिला आघाडी उपाध्यक्ष सौ नेहा गवाणकर व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मेळाव्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आदर्श शाळांचा सत्कार, विद्यार्थी गुणगौरव, होतकरू मुले मदत व कलारत्न पुरस्कार वितरण होणार आहे. या वार्षिक मेळाव्याला सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष दिनकर शिरवलकर व सचिव कृष्णा कालकुंद्रीकर यांनी केले आहे.