मालवण | ब्यूरो न्यूज : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने शहरातील बांगीवाडा येथील समाज मंदिर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व सहकारी यांनी भेट दिली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, युवासेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख प्रितम गावडे, शहर प्रमुख बाळू नाटेकर, दिलीप बिरमोळे, बाळा माने, अरुण तोडणकर, जॉन नरोना, महेश सारंग, राजू बिडये, बाबू धुरी, मंदार लुडबे, जय सामंत, भाऊ मोरजे, बाबू जोशी, सुरज बिरमोळे, शानू वालावलकर व सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते.