30.1 C
Mālvan
Wednesday, April 16, 2025
IMG-20240531-WA0007

सुप्रसिद्ध व सुप्रतिक्षीत ‘गराजलो रे गराजलो’ नाटक आता गराजणार..!

- Advertisement -
- Advertisement -

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतकरू नवोदित कलाकारांना दिली आहे व्यावसायिक नाट्यक्षेत्रात पदार्पणाची संधी..

वेंगुर्ले तालुक्यातील आडेली गावात शुभारंभाचा प्रयोग

चिंदर | विवेक परब : श्री सोमेश्वर कलामंच या सामाजिक संस्थेची निर्मिती असलेल्या ,’गराजलो रे गराजलो’ या नाटकाद्वारे जनजागृती करता करता स्थानिक स्तरावरील भूमीपुत्रांसाठीचे  १५ मुद्दे घेऊन नि:स्वार्थीपणे “गराजलो रे गराजलो” ही एक चळवळ सुरू केली आहे. या नाटकाचे प्रयोग प्रत्येक गावा गावात ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर करायचा हेतू ठेवून श्री.सोमेश्वर कलामंचाने या नाटकाचा दुसरा संच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक कलावंतांना घेऊन सज्ज केला आहे. या स्थानिक कलावंतांना  व्यावसायिक नाट्यक्षेत्रात उतरायची संधी देण्यासाठी गेले वर्षभर टीम गराजलो रे गराजलो व श्री सोमेश्वर कलामंचचे सर्वेसर्वा श्री.सहदेव धर्णे स्वतः प्रयत्नशील होते.
या नाटकातुन मिळणाऱ्या रक्कमेतुन खर्च वजा करुन काही रक्कम सामाजिक उपक्रमांसाठी वापरली जाणार आहे
सोबतच मुंबईतील  ‘गराजलो रे गराजलो’ हा संचदेखील नाट्य प्रयोगांसाठी सज्ज आहेच.

लवकरात लवकरच मुंबईमध्ये सुद्धा प्रयोग सुरू होणार आहेत ‌.
मुंबई येथील संचामध्येही अतिशय होतकरु आणि कसलेल्या नाट्य अभिनेते, अभिनेत्री व तंत्रज्ञ यांचा भरणा आहे.
गराजलो रे गराजलोच्या या संपूर्ण नाट्य चळवळ तथा अभियानाचे नेतृत्व करणार्या व श्री सोमेश्वर कलामंचचे अध्यक्ष असणार्या श्री.सहदेव धर्णे (मुंबई)यांनी ही माहिती दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्यरसिकांची ‘गराजलो रे गराजलो’ नाटक व चळवळीसंबंधीची आत्मियता लक्षात घेऊनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात गराजलो रे गराजलो नाटकाच्या दुसर्या संचाची निर्मिती केली असल्याचेही श्री.सहदेव धर्णे यांनी स्पष्ट केले आहे.
या नाटकाच्या प्रयोगांविविषयी आणि एकूणच चळवळीविषयी काही माहिती आवश्यक असल्यास स्वतः श्री.सहदेव धर्णे ८७७९३२६६५६/९७०२०८७९३३ आणि श्री अशोक परब ७०५७४९०६६६ यांच्याशी संपर्क साधायचे विनम्र आवाहन श्री.सहदेव धर्णे यांनी केले आहे.

( फोटो : श्री .सहदेव धर्णे )

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतकरू नवोदित कलाकारांना दिली आहे व्यावसायिक नाट्यक्षेत्रात पदार्पणाची संधी..

वेंगुर्ले तालुक्यातील आडेली गावात शुभारंभाचा प्रयोग

चिंदर | विवेक परब : श्री सोमेश्वर कलामंच या सामाजिक संस्थेची निर्मिती असलेल्या ,'गराजलो रे गराजलो' या नाटकाद्वारे जनजागृती करता करता स्थानिक स्तरावरील भूमीपुत्रांसाठीचे  १५ मुद्दे घेऊन नि:स्वार्थीपणे "गराजलो रे गराजलो" ही एक चळवळ सुरू केली आहे. या नाटकाचे प्रयोग प्रत्येक गावा गावात 'ना नफा ना तोटा' या तत्वावर करायचा हेतू ठेवून श्री.सोमेश्वर कलामंचाने या नाटकाचा दुसरा संच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक कलावंतांना घेऊन सज्ज केला आहे. या स्थानिक कलावंतांना  व्यावसायिक नाट्यक्षेत्रात उतरायची संधी देण्यासाठी गेले वर्षभर टीम गराजलो रे गराजलो व श्री सोमेश्वर कलामंचचे सर्वेसर्वा श्री.सहदेव धर्णे स्वतः प्रयत्नशील होते.
या नाटकातुन मिळणाऱ्या रक्कमेतुन खर्च वजा करुन काही रक्कम सामाजिक उपक्रमांसाठी वापरली जाणार आहे
सोबतच मुंबईतील  'गराजलो रे गराजलो' हा संचदेखील नाट्य प्रयोगांसाठी सज्ज आहेच.

लवकरात लवकरच मुंबईमध्ये सुद्धा प्रयोग सुरू होणार आहेत ‌.
मुंबई येथील संचामध्येही अतिशय होतकरु आणि कसलेल्या नाट्य अभिनेते, अभिनेत्री व तंत्रज्ञ यांचा भरणा आहे.
गराजलो रे गराजलोच्या या संपूर्ण नाट्य चळवळ तथा अभियानाचे नेतृत्व करणार्या व श्री सोमेश्वर कलामंचचे अध्यक्ष असणार्या श्री.सहदेव धर्णे (मुंबई)यांनी ही माहिती दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्यरसिकांची 'गराजलो रे गराजलो' नाटक व चळवळीसंबंधीची आत्मियता लक्षात घेऊनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात गराजलो रे गराजलो नाटकाच्या दुसर्या संचाची निर्मिती केली असल्याचेही श्री.सहदेव धर्णे यांनी स्पष्ट केले आहे.
या नाटकाच्या प्रयोगांविविषयी आणि एकूणच चळवळीविषयी काही माहिती आवश्यक असल्यास स्वतः श्री.सहदेव धर्णे ८७७९३२६६५६/९७०२०८७९३३ आणि श्री अशोक परब ७०५७४९०६६६ यांच्याशी संपर्क साधायचे विनम्र आवाहन श्री.सहदेव धर्णे यांनी केले आहे.

( फोटो : श्री .सहदेव धर्णे )

error: Content is protected !!