27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

दशावताराच्या लोकप्रिय राजाचा पद्मश्रींच्या सुवर्णहस्ते सन्मान..! (कला विशेष)

- Advertisement -
- Advertisement -

श्री.उदय राणे कोनस्कर यांना फ.रा.प्रतिष्ठानच्या वतीने नाट्यकर्मी पुरस्कार…!

कणकवली | उमेश परब | कला विशेष (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ) : अनेक मेहनतीच्या रात्री साकार करत साकारलेली अद्भुत कला…त्यात जीवतोड मेहनत केलेला दशावतार कलावंत…दव, थंडी किंवा कधीतरी पोटाचाही विचार न करता फक्त आणि फक्त पारंपारिक लोककलेचा गंध प्रेक्षकरुपी जनमानसात टिकून रहावा म्हणून राजासारखा झटणारा लोकप्रिय असा दशावतारातील राजा..त्याच्या अजोड मेहनतीला नाट्यकर्मी पुरस्काराची शाल आणि त्या कलासन्मानाच्या शालीला पांघरणारे कलासक्त पद्मश्रींचे लोककलेला जगलेले व जपलेले ऊबदार हात..!”
किती अविश्वसनीय आणि सर्वोच्च लोक कलासन्मानाचा विचार आहे ना हा !
परंतु हा विचार सत्यात आणलेले आणि वास्तवात साकार केलेले व्यक्तिमत्त्व ठरलेत कोकणातील श्री.उदय राणे कोनस्कर.
उदय राणे कोनस्कर हे गेली अनेक वर्षे दशावतारात राजाची भूमिका करत आहेत. विविध भूमिका करून रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या उदय राणे कोनस्कर यांना नाट्यकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
कोणशी गावचे सुपुत्र उदय राणे कोनस्कर हे आपले वडील बाबा कोनस्कर, बंधू दादा कोनस्कर यांच्या पावलावर पाऊल ठेवून दशावतार कला सादर करत आहेत. उदय कोनस्कर यांच्या अनेक भूमिका आजही रसिकांच्या मनात आहेत. यात वसुदेव, भिष्म,
ययाती देवयानीतील ययाती, तुळजाभवानी मधील सुंदर,
सतायु सत्वपरिक्षा मधील राजा सतायु, भर्तरी पींगला मधील “
राजा भर्तरी, मंस्यगंधा मधील राजा शंतनु, संगीत सौंभद्र मधील अर्जुन, लक्ष्मीची पाऊले मधील कृष्ण, विश्वकर्मा मधील राजा सुरथ, स्वामि समर्थ मधील परशु तर ऐवढा गाजवला की त्याला लोककला प्रेक्षकांनी उचलून धरला.
फ .रा .प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा मनाचा नाट्यकर्मी पुरस्कार लोकप्रिय राजा उदय राणे कोनसकर यांना प्रदान करण्यात आला. पद्मश्री परशुराम गंगावणेे व फ. रा प्रतिष्ठान चे सर्वेसर्वा प्रेमानंद देसाई यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. उदय राणे कोनस्कर हे गेली अनेक वर्षे दशावतारात राजाची भूमिका करत आहेत. विविध भूमिका करून रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या उदय राणे कोनस्कर यांना नाट्यकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
पुरस्कार वितरण समारंभावेळी साकारलेली काशी नरेश काशीराजा ची भूमिका सादर करून त्यांनी उपस्थितांची मधुन वाहव्वा मिळवली शिवाय दुःखी प्रसंग उभा करून अक्षरशः डोळ्यात अश्रू आणले. उपस्थित मायबाप प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून आणि रंगपटावर येऊन उदय राणे कोनस्कर यांचे अभिनंदन केले आणि शाबासकी दिली .
ज्या भूमीतील लोककलेचा कलासर्वोच्च सन्मान झालाय व तो ज्याचा झालाय अशा साक्षात् पद्मश्रींच्या सुवर्णहस्ते त्याच भूमीत हा पुरस्कार मिळवणारे उदय राणे कोनस्कर यांचा सन्मान आज अनेक लोककलावंताना किंबहुना दशावतारातील प्रत्येक लोकप्रिय राजाला सम्राट बनवून गेलाच..!

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

1 Comment

  1. दशावतारी राजा श्री. उदय राणे-कोनस्कर ह्यांचे मन:पुर्वक अभिनंदन.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

श्री.उदय राणे कोनस्कर यांना फ.रा.प्रतिष्ठानच्या वतीने नाट्यकर्मी पुरस्कार…!

कणकवली | उमेश परब | कला विशेष (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ) : अनेक मेहनतीच्या रात्री साकार करत साकारलेली अद्भुत कला…त्यात जीवतोड मेहनत केलेला दशावतार कलावंत…दव, थंडी किंवा कधीतरी पोटाचाही विचार न करता फक्त आणि फक्त पारंपारिक लोककलेचा गंध प्रेक्षकरुपी जनमानसात टिकून रहावा म्हणून राजासारखा झटणारा लोकप्रिय असा दशावतारातील राजा..त्याच्या अजोड मेहनतीला नाट्यकर्मी पुरस्काराची शाल आणि त्या कलासन्मानाच्या शालीला पांघरणारे कलासक्त पद्मश्रींचे लोककलेला जगलेले व जपलेले ऊबदार हात..!"
किती अविश्वसनीय आणि सर्वोच्च लोक कलासन्मानाचा विचार आहे ना हा !
परंतु हा विचार सत्यात आणलेले आणि वास्तवात साकार केलेले व्यक्तिमत्त्व ठरलेत कोकणातील श्री.उदय राणे कोनस्कर.
उदय राणे कोनस्कर हे गेली अनेक वर्षे दशावतारात राजाची भूमिका करत आहेत. विविध भूमिका करून रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या उदय राणे कोनस्कर यांना नाट्यकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
कोणशी गावचे सुपुत्र उदय राणे कोनस्कर हे आपले वडील बाबा कोनस्कर, बंधू दादा कोनस्कर यांच्या पावलावर पाऊल ठेवून दशावतार कला सादर करत आहेत. उदय कोनस्कर यांच्या अनेक भूमिका आजही रसिकांच्या मनात आहेत. यात वसुदेव, भिष्म,
ययाती देवयानीतील ययाती, तुळजाभवानी मधील सुंदर,
सतायु सत्वपरिक्षा मधील राजा सतायु, भर्तरी पींगला मधील "
राजा भर्तरी, मंस्यगंधा मधील राजा शंतनु, संगीत सौंभद्र मधील अर्जुन, लक्ष्मीची पाऊले मधील कृष्ण, विश्वकर्मा मधील राजा सुरथ, स्वामि समर्थ मधील परशु तर ऐवढा गाजवला की त्याला लोककला प्रेक्षकांनी उचलून धरला.
फ .रा .प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा मनाचा नाट्यकर्मी पुरस्कार लोकप्रिय राजा उदय राणे कोनसकर यांना प्रदान करण्यात आला. पद्मश्री परशुराम गंगावणेे व फ. रा प्रतिष्ठान चे सर्वेसर्वा प्रेमानंद देसाई यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. उदय राणे कोनस्कर हे गेली अनेक वर्षे दशावतारात राजाची भूमिका करत आहेत. विविध भूमिका करून रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या उदय राणे कोनस्कर यांना नाट्यकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
पुरस्कार वितरण समारंभावेळी साकारलेली काशी नरेश काशीराजा ची भूमिका सादर करून त्यांनी उपस्थितांची मधुन वाहव्वा मिळवली शिवाय दुःखी प्रसंग उभा करून अक्षरशः डोळ्यात अश्रू आणले. उपस्थित मायबाप प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून आणि रंगपटावर येऊन उदय राणे कोनस्कर यांचे अभिनंदन केले आणि शाबासकी दिली .
ज्या भूमीतील लोककलेचा कलासर्वोच्च सन्मान झालाय व तो ज्याचा झालाय अशा साक्षात् पद्मश्रींच्या सुवर्णहस्ते त्याच भूमीत हा पुरस्कार मिळवणारे उदय राणे कोनस्कर यांचा सन्मान आज अनेक लोककलावंताना किंबहुना दशावतारातील प्रत्येक लोकप्रिय राजाला सम्राट बनवून गेलाच..!

error: Content is protected !!