पहिल्या चाचणीला मिळाला होता अल्पप्रतिसाद…!
जास्तीतजास्त मुलामुलींनी संधीचा लाभ घेण्याचे जिल्हा क्रिडा अधिकार्यांचे आवाहन
ओरोस | प्रतिनिधी :क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत शुक्रवार २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता कबड्डी या खेळ प्रकाराचे खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र निवड चाचणीसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रसाठी दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी निवड चाचणी आयोजित करण्यात आलेली होती या निवड चाचणीस खेळाडूंचा अल्प प्रतिसाद असल्याने पात्र खेळाडू प्राप्त न झाल्याने पुनश्च दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ राजी सकाळी ९ वाजता खेला इंडिया प्रशिक्षण केंद्रासाठी कबड्डी खेळाडुंची निवडचाचणी आयोजित करण्यात आलेली आहे. सदरच्या निवड चाचणीस खेळाडूंसाठी वयोमर्यादा ८ ते १२ वर्षाखालील मुले, मुली ही आहे. खेळाडुंनी निवड चाचणीस येताना कबड्डी किट तसेच जन्म तारखेचा पुरावा आधारकार्ड, जन्मदाखला सोबत आणणे आवश्यक आहे.
खेळाडुंना खेलो इंडिया अंतर्गत मिळणार्या संधीचा राष्ट्रीय स्तरापर्यंत व पुढेही असल्याने या चाचणीला जास्तीतजास्त मुलामुलींनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकार्यांनी केले आहे.