वाणिज्य शाखेतुन संध्या म्हापणकर तर कला शाखेतून महेश वरक प्रथम चौके । प्रतिनिधी : स्व. सौ. जयश्री वामन प्रभु कला व वाणिज्य ( संयुक्त ) कनिष्ठ महाविद्यालय, काळसे, मालवणचा सन २०२० – २१ चा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल १००% लागला आहे. या विद्यालयातून बारावी परीक्षेसाठी कला व वाणिज्य शाखेतून संयुक्त २५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले.
वाणिज्य शाखेतून कुमारी संध्या लक्ष्मण म्हापणकर हिने ८९.००% गुण मिळवत प्रथम, तन्वी महेश करलकर हिने ७९.६७ % गुण मिळवून द्वितीय तर चेतना कमलाकर महाराव हिने ७९.३३% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला
तर कला शाखेतुन कु. महेश बाबू वरक याने ७३.८३ % गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला . निखिल प्रमोद परब याने ७०.८३% गुण मिळवून द्वितीय आणि नितेश नारायण काळसेकर याने ६७.३३% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
सर्व यशस्वी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संस्था पदाधिकारी तसेच मुंबई समिती आणि माजी विद्यार्थी सेवा संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, देणगीदार, पालक, यांनी अभिनंदन केले आहे.