मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र मुंबई परिक्षा मंडळ मुंबई आयोजित
राज्यस्तरीय इंग्रजी व्याकरण परीक्षा २०२४-२५ मध्ये भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल, मसुरे मर्डे या प्रशालेचे विद्यार्थी कु. स्वराज चव्हाण (गृप बी) इयत्ता तिसरी व चौथी या गटातून १०० पैकी ९६ गुण व कु. वंशिका खोत यांनी ( गृप सी) इयत्ता पाचवी ते सातवी या गटातून १०० पैकी ९३ गुण) मिळवत राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

कु. स्वराज चव्हाण.

कु. वंशिका खोत.
शाळेत एकूण ५५ विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यापैकी ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्था अध्यक्ष प्रकाश परब , स्कूल कमिटी चेअरमन संग्राम प्रभूगावकर संस्था पदाधिकारी बाबाजी भोगले ,संस्था सचिव अशोक मसुरेकर मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी, शाळा समिती सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षिका म्हणून सिस्टर कांता, स्टेला लोबो, सिद्धी मेस्त्री, रसिका मेस्त्री, स्वरांजली ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.