कु. पियुष लाड जिल्ह्यात प्रथम.
कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत नेरूर शिरसोस शाळेच्या इयत्ता चौथीतील कु. पियुष विजय लाड याने एकूण ३०० पैकी २८४ गुण मिळवले व जिल्ह्यात प्रथम प्राप्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत नेरुर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नेरुर शिरसोस शाळेच्या अन्य विद्यार्थ्यांनी भरीव यश मिळवले.

कु. पियुष लाड.
सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता चौथीचा निकाल १००%लागला असून सर्व विद्यार्थ्यांनी २००हून अधिक गुण प्राप्त केले आहेत. सान्वी प्रकाश केरकर २३६ गुण, जयेश महेश नेवगी २१८ गुण, पार्थ अनिल नेवगी २१६ गुण, रुद्र मिलिंद केरकर २१६ गुण वअथर्व यशवंत गावडे २१२ गुण प्राप्त केले आहेत.
चौथीच्या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका सौ. अरुणा घाटकर, सौ. प्रीती कुबल, सौ. पूजा कोठावळे, मुख्याध्यापक श्री. श्रीकृष्ण ठाकूर आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख श्री गोविंद चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ व ग्रामस्थ नेरुर शिरसोस यांच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.