30.1 C
Mālvan
Wednesday, April 16, 2025
IMG-20240531-WA0007

मालवणात राष्ट्रीय भूमापन दिनानिमित्त कार्यक्रम.

- Advertisement -
- Advertisement -

उप अधीक्षक भूमि अभिलेख श्री विनोद काळे, प्रमुख पाहुणे श्री. गणेश कुशे व मान्यवर उपस्थित.

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील उप अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालय येथे राष्ट्रीय भूमापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात उप अधीक्षक भूमि अभिलेख श्री विनोद काळे, माजी नगरसेवक श्री. गणेश कुशे, शिरस्तेदार यशवंत नाईक, समाजसेवक आनंद गांवकर व अजय मुणगेकर तसेच मुख्यालय सहाय्यक मंगेश मालप, निमतानदार गौतम कदम, परीरक्षण भूमापक श्रद्धा नाईक, अभिलेखापाल रघुवीर परब, छाननी लिपिक सचिन टिकम, भूकरमापक वैभव राजनोर, दप्तरबंद मोहन तांडेल आदी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी भूमि अभिलेख कार्यालयाच्या वतीने भूमापन उपकरणांचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. कार्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. माजी नगरसेवक गणेश कुशे यांनी अधिकारी व कर्मचारी वर्गाला राष्ट्रीय भूमापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी उप अधीक्षक भूमि अभिलेख श्री विनोद काळे यांनी सांगितले की, १० एप्रिल १८०२ रोजी भारतातील पहिली जमीन मोजणी झाली होती म्हणून आज राष्ट्रीय भूमापन दिन साजरा करण्यात येतो. त्यांनी जमीन मोजणीचे महत्व, जमीन मोजणीतील सुधारणा व संबंधित गोष्टींची थोडक्यात माहिती दिली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

उप अधीक्षक भूमि अभिलेख श्री विनोद काळे, प्रमुख पाहुणे श्री. गणेश कुशे व मान्यवर उपस्थित.

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील उप अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालय येथे राष्ट्रीय भूमापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात उप अधीक्षक भूमि अभिलेख श्री विनोद काळे, माजी नगरसेवक श्री. गणेश कुशे, शिरस्तेदार यशवंत नाईक, समाजसेवक आनंद गांवकर व अजय मुणगेकर तसेच मुख्यालय सहाय्यक मंगेश मालप, निमतानदार गौतम कदम, परीरक्षण भूमापक श्रद्धा नाईक, अभिलेखापाल रघुवीर परब, छाननी लिपिक सचिन टिकम, भूकरमापक वैभव राजनोर, दप्तरबंद मोहन तांडेल आदी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी भूमि अभिलेख कार्यालयाच्या वतीने भूमापन उपकरणांचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. कार्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. माजी नगरसेवक गणेश कुशे यांनी अधिकारी व कर्मचारी वर्गाला राष्ट्रीय भूमापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी उप अधीक्षक भूमि अभिलेख श्री विनोद काळे यांनी सांगितले की, १० एप्रिल १८०२ रोजी भारतातील पहिली जमीन मोजणी झाली होती म्हणून आज राष्ट्रीय भूमापन दिन साजरा करण्यात येतो. त्यांनी जमीन मोजणीचे महत्व, जमीन मोजणीतील सुधारणा व संबंधित गोष्टींची थोडक्यात माहिती दिली.

error: Content is protected !!