मसुरे | प्रतिनिधी : संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान पेंडूर, यांच्यातर्फे १० वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांकरिता करिअर मार्गदर्शन शिबीर २८ मार्च रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत माडये हॉल, कट्टा येथे आयोजित करण्यात आले आहे. यात १० वी / १२ वी नंतर पुढील करियर दिशा, आपल्यामधील आवड ओळखून योग्य विषयाची / शाखेची निवड करणे यावर संबंधित विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. सोबतच पोलीस भरती तसेच कला क्षेत्रात आवड असणाऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन देखील असेल. या शिबीराकरिता विद्यार्थ्यांबरोबर एक पालक उपस्थित राहणे अपेक्षित असेल.

यावेळी श्री. विश्वनाथ कदम पोलीस भरती विषयी मार्गदर्शन, प्रा. सिद्धेश नेरुरकर उपयोजित कला (Applied Art) आणि ललितकला (Fine Art) यांची ओळख, प्रा. चेतन जगताप CET सामायिक प्रविष्ट प्रक्रियेची ओळख, श्री. विलास वखारे प्रमुख वक्ते व करीअर मार्गदर्शक आहेत. हे शिबीर विनामूल्य आहे व याकरिता पूर्वनोंदणी आवश्यक आहे. दशक्रोशीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.