तारकर्लीतील मुलांचा सलग सातव्या वर्षी उपक्रम.
मालवण | ब्यूरो न्यूज : तारकर्ली येथील मुलांनी, शिमग्याच्या खेळातून जमा झालेला निधी सुगंधी रामचंद्र धुरी, भावना भिकाजी बांदेकर, श्री. अविनाश चंद्रकांत धुरत आणि बुधाजी रघुनाथ लोणे या गरजू कुटुंबाना मदत म्हणुन दिला.


या उपक्रमात कु. रोहन कांदळगावकर, नैतिक कांदळगावकर, आरव कांदळगावकर, मृणाल सारंग, कुमार तेंडोलकर, सर्वेश नेवाळकर, निनाद मोंडकर, ईशांत सागवेकर, ॠषभ खराडे, रोहित वरक, दत्तराज पाटकर, हार्दिक टिकम, वरुण तांडेल आदींचा सहभाग होता.


तारकर्ली पंचक्रोशीतून या मुलांची प्रशंसा होत आहे.