काही समस्या जागीच सोडवल्या तर काही समस्या मुदतीत सोडवण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी ओरोस येथील शासकीय कार्यालयात आज जनतेच्या गाठीभेटी घेऊन त्यांची निवेदनं स्वीकारून समस्या ऐकून घेतल्या. त्यांनी काही समस्या त्याच ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना देऊन सोडवल्या तर काही समस्या व प्रश्न समजावून घेत ते मुदतीत सोडवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

श्री. नितेश राणे ( पालकमंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा)

सुमारे चार तास चाललेल्या या गाठी भेटी मध्ये एक हजार वर निवेदने सादर झाली. या वेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जि प उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदींसह पदाधिकारी व जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.