मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ समर्थ गड – आडवली येथे श्री स्वामी समर्थ जयंती सोहळ्या निमित्त ३१ मार्च ते ०३ एप्रिल २०२५ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३१ मार्च रोजी सकाळी ६ ते ९ विधिवत पूजा, सकाळी ९ नंतर भक्तांना दर्शन,
दुपारी १२.३० वा. महाआरती, दुपारी १.०० वा. महाप्रसाद, दुपारी ३.०० ते ८.०० वा. हळदी कुंकू, रात्री ८.०० ते ८.३० या. महाआरती, रात्री ९.०० वा. पारंपरिक डबलबारी भजन सामना ( बुवा श्रीधर मुणगेकर विरुद्ध बुवा लक्ष्मण गुरव ) यांच्यात होणार आहे.

०१ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता मराठी वाद्यवृंद (चिमणी पाखरं) महाराष्ट्राची पारंपारिक लोकधारा हा कार्यक्रम होणार आहे. २ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता हिंदी वाद्यवृंद (चिमणी पाखरं)नृत्य – अविष्कार, भन्नाट कॉमेडी, मिमिक्री.
३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता सांगता सोहळा विधिवत पूजा, रात्री ८ ते ८.३० महाआरती, रात्री ८ वाजता २०.२० डबलबारी भजन सामना बुवा संदीप लोके विरुद्ध बुवा अजित मुळम या दोहोच्यात हा सामना होणार आहे.
अधिक माहिती साठी डॉ. सिध्देश सकपाळ ८७६७३४१३२९, प्रकाश गवस, सिताराम सकपाळ, अतुल घाडीगांवकर,समीर घाडी, गणेश घाडी, आकाश तावडे येथे संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली आहे
उपस्थितीचे आवाहन श्री भाई महाराज यांनी श्री स्वामी समर्थ मठ समर्थ गड – आडवली यांच्या वतीने केले आहे.