माणगाव सेंट जोसेफ नं. ४ प्रशालेची विद्यार्थीनी.
सर्व स्तरातून अभिनंदन.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. ए. पी जे.अब्दुल कलाम शिष्यवृत्ती २०२४-२५ या स्पर्धा परीक्षेत माणगाव सेंट जोसेफ नं. ४ केंद्र शाळेची कु. मिताली मिलिंद धुरी हिने २४६ गुण मिळविले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वयातच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी, यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. परीक्षेसाठी मुख्याधापिका सौ. स्नेहा पालकर, शिक्षिका सौ. दिपा सावंत, सहाय्यक शिक्षिका सौ. रेश्मा काळे यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व स्तरावरून आणि प्रशालेच्या वतीने कु. मिताली मिलिंद धुरीचे अभिनंदन होत आहे.