मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका टिपणी आणि बदनामी केल्याचा आरोप करत कुणाल कामरा ( स्टॅन्ड अप काॅमेडिअन) याचा मालवण शिवसेनेने निषेध नोंदवत प्रतिकात्मक पुतळा जाळला. मालवण भरड नाका येथे जोरदार घोषणा देत कामरा याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.

यावेळी शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, महेश कांदळगांवकर, राजा गांवकर, बाळू नाटेकर, निलम शिंदे, अंजना सामंत, ऋत्विक सामंत, सोनाली पाटकर, प्रितम गावडे, पराग खोत, संकेत राऊळ, तोडणकर, आनंद खवणेकर, हरी खवणेकर, संदीप भोजणे, ऋषिकेश सामंत, कमलेश सारंग यांसह शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.