ब्यूरो न्यूज : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मसुरे, आंगणेवाडी येथे भेट दिली आणि श्री देवी भराडी यात्रा तथा आंगणे कुटुंबियांच्या वार्षिकोत्सव २०२५ च्या पूर्वतयारीची पहाणी करत आढावा घेतला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह आनंद शिरवलकर, मंदार लुडबे, कमलेश प्रभू, छोटू ठाकुर, बाबू आंगणे, काका आंगणे, राजवीर पाटील, शानू वालावलकर तसेच पदाधिकारी व आंगणे कुटुंबीय उपस्थित होते.