28 C
Mālvan
Tuesday, January 14, 2025
IMG-20240531-WA0007

आ. निलेश राणे यांची कुडाळ येथे एमआयडीसीच्या विषयांच्या संदर्भात बैठक.

- Advertisement -
- Advertisement -

आजारी उद्योगांना नवसंजीवनी आणि नव्या उद्योगांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नवा प्रस्ताव बनवण्याच्या सूचना.

कुडाळ | ब्यूरो न्यूज : कुडाळ एमआयडीसीमध्ये असलेले आजारी उद्योगांना नवसंजीवनी आणि नव्या उद्योगांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नवा प्रस्ताव बनवा अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तसेच कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पासाठी पर्यायी जागा मिळाली नाही तर मंजूर असलेल्या जागेवर हा प्रकल्प करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन एमआयडीसी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना केले. कुडाळ एमआयडीसी येथे एमआयडीसीच्या विषयांच्या संदर्भात आमदार निलेश राणे यांनी बैठक घेतली. यावेळी एमआयडीसीच्या विभागीय अधिकारी वंदना खरमाळे, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, नकुल पार्सेकर, राजन नाईक, श्री प्रभू, श्री तेरसे, एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश रेवंडकर, एमआयडीसी विद्युत विभागाचे उपअभियंता प्रेरणा नागवेकर, क्षेत्र व्यवस्थापक संजय कसबे, महावितरण कंपनीचे प्रशासन विभागाचे कार्यकारी अभियंता वाघ, कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद नातू तसेच शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, संचालक निलेश तेंडोलकर, रुपेश पावसकर, नगरसेवक विलास कुडाळकर, संध्या तेरसे आदी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये सुरुवातीला आमदार निलेश राणे यांनी एमआयडीसीच्या सद्य परिस्थितीबाबत विचारणा केली यामध्ये एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी सुद्धा परिस्थिती सांगितली. यामध्ये अनेक उद्योग आजारी आहेत. या उद्योगांना पुनर्जीवित करण्याची गरज आहे. तसेच या ठिकाणी विद्युत पुरवठ्याचा मोठा सामना उद्योजकांना करावा लागतो. त्यासाठी सबस्टेशन व्हावे म्हणून मागणी केली सबस्टेशनला जागा सुद्धा देण्यात आली आहे. मात्र हे सबस्टेशन होत नाही ते करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली या सबस्टेशनमध्ये काय त्रुटी दूर करून याबाबतचा अहवाल देण्याबाबत आमदार निलेश राणे यांनी सूचना दिल्या.

या बैठकीत कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या जागेबद्दल चर्चा करण्यात आली. यामध्ये असोसिएशनने आपली भूमिका मांडताना सांगितले की, आमचा विरोध नाही पण त्याचा त्रास आजूबाजूच्या लोकांना होता नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. पर्यायी जागा शोधल्यास आम्ही पूर्णपणे नगरपंचायतीच्या पाठीशी राहू असे सांगितले. यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले. की मोठ मोठ्या शहरांमध्ये भर वस्तीमध्ये असे प्रकल्प होतात. टेक्नॉलॉजी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. तरी तुमचं म्हणणं असेल तर पर्यायी जागा शोधू जर पर्यायी जागा मिळाली नाही तर सर्वांनी सकारात्मकता दाखवून सध्या मंजूर झालेल्या जागेमध्ये हा प्रकल्प कसा उभा राहील हे बघितले पाहिजे कारण स्वच्छता सुद्धा महत्त्वाची आहे असे सांगितले.

यावेळी उद्योजकांनी एमआयडीसी सुरू असलेल्या बायोमेडिकल प्रकल्पाबाबत सांगितले की, या ठिकाणी होणारी प्रक्रिया जवळच असलेल्या अन्नप्रक्रिया उद्योगांना बाधक ठरत आहे. यावर निर्णय द्यावा तसेच याबाबत नगरसेविका संध्या तेरसे यांनी भूमिका मांडली. आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, जर कायद्याच्या चौकटीत बायोमेडिकलचे काम होत नसेल तर त्यांना नोटिसा काढा. प्रदूषण नियंत्रण विभागाला कळवा आणि त्यांच्यावर कारवाई करा या बायोमेडिकलच्या होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो असे त्यांनी सांगितलं. तसेच ते म्हणाले की जर ते ऐकत नसतील तर मी स्वतः पोलीस ठाण्यात तक्रार देईल.

या बैठकीमध्ये आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, कुडाळ एमआयडीसी मध्ये अनेक उद्योग बंद आहेत. बंद असलेल्या उद्योगांना नव्याने काय करता येईल हे पाहणे गरजेचे आहे. तसेच नवे उद्योग उभे राहावे म्हणून प्रस्ताव येणे गरजेचे आहे. एमआयडीसी विभागाने येत्या आठ दिवसांमध्ये कुडाळ एमआयडीसी औद्योगिक रित्या कशी विकसित होईल त्यासाठी आवश्यक उद्योग कोणते आहेत याचा प्रस्ताव करून पाठवावा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तसेच या खात्याचे मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून कुडाळ एमआयडीसीला नवसंजीवनी आणू यामध्ये एमआयडीसी असोसिएशन आणि उद्योजकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!