कुडाळ | प्रतिनिधी : पावशी व आंबडपाल येथील तीर्थक्षेत्र श्री नवनाथ तपोभूमी देव डोंगर येथे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले जिल्हा नियोजनचे सदस्य काका कुडाळकर यांच्या निधीमधून हा खर्च होणार आहे. पावशी व आंबडपाल सीमेवर असलेले तीर्थक्षेत्र श्री नवनाथ तपोभूमी देव डोंगर येथे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. हा रस्ता व्हावा म्हणून भक्तांसह ग्रामस्थांनी मागणी केली होती.
जिल्हा नियोजन सदस्य काका कुडाळकर यांच्या निधीतून हा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. या देव डोंगराबरोबरच कुडाळ शहराला पाणीपुरवठा करणारी टाकी देखील आहे. रस्ता झाल्यामुळे भाविक व ग्रामस्थांना वाहने व्यवस्थित तीर्थक्षेत्र पर्यंत घेऊन जाता येणार आहेत. या रस्त्याचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा नियोजन सदस्य व राष्ट्रवादीचे काका कुडाळकर, पावशी सरपंच वैशाली पावसकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, सर्वेश पावसकर, शिवसेना तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, अरविंद करलकर, रामदास तेंडोलकर आदी उपस्थित होते.