मसुरे | प्रतिनिधी : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, शाखा देवगड यांच्या सौजन्याने व श्री देवी भगवती देवस्थान मुणगे आणि डॉ. सुजित एकनाथ कदम यांच्या संयुक्त विद्यमाने मुणगे श्री भगवती देवालय नजिक १५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० ते १.०० या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींनी पुढील नंबरवर संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली आहे.
श्री. ओंकार पाध्ये (अध्यक्ष, श्री देवी भगवती देवस्थान मुणगे ९५२९३२७५७५),डॉ. सुजित कदम
( श्री. दत्त कृपा क्लिनिक मुणगे ९४०५२७४९३६),
श्री. देवदत्त पुजारे (व्यवस्थापक, श्री भगवती हायस्कूल मुणगे ९४२११४६१६६).