आमदार निलेश राणे यांची कामगिरी दमदार : माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील विविध समस्या प्रश्नी नागरिकांच्या प्राप्त तक्रारीनुसार आमदार निलेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी मालवण शहरात रात्री फिरून स्पॉट पंचनामा केला होता. त्या नंतर नगरपरिषद प्रशासन तात्काळ ऍक्शन मोडवर आले आहे. मच्छिमार्केट येथील कचरा उचल करण्यासाठी दिवसभर कचरा गाडी तैनात करण्यात आली असून कचरा उचल सुरु राहणार आहे. याठिकाणी असलेल्या सेल्फी पॉईंट ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवली जाणार आहे. या बरोबर बंदर जेटी येथे बंद असलेले सुलभ शौचालय नागरिक व पर्यटक यांसाठी सुरु करण्यात आले आहे.

मच्छीमार्केट याठिकाणी असलेल्या सेल्फी पॉइंट ठिकाणी मोठया प्रमाणात कचरा टाकला जात होता. हा कचरा मोकाट कुत्रे, भटकी जनावरे सर्वत्र पसरून टाकत होती. व्यापारी, नागरिक यांना याचा मोठा त्रास होत होता. यां ठिकाणवरून जाणाऱ्या पर्यटकांनाही हे दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पाहावे लागत होते. त्यांच्या तक्रारी थेट आमदार निलेश राणे यांच्याकडे जाताच त्यांनी त्या ठिकाणी भेट देत पाहाणी केली. त्यासोबत मच्छीमार्केट व अन्य ठिकाणी पाहाणी केली होती.
यांनंतर प्रशासन ऍक्शन मोडवर आले. हा परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच कचरा गाडी उभी करुन ठेवली जाणार आहे. दिवसातून तीन वेळा त्या गाडीत कचरा भरणा झाल्या नंतर कचरा डपिंग ग्राउंड ला नेवून टाकला जाणार. शेवटची ट्रिप रात्री दहा वाजता असणार. याठिकाणी दिवस रात्र मोठया प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने यावर लक्ष रहावे यासाठी याठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
मालवण बंदर जेटी येथील सुलभ शौचालय येथील अस्वच्छता घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य यां बाबत आमदार निलेश राणे यांच्याकडे नागरिकांनी तक्रार केली होती. आता या ठिकाणी तातडीने साफसफाई करुन पे अँड यूझ तत्वावर सुलभ सौचलय सुरु करण्यात आले आहे. तसेच बंदर जेटी वर चांगल्या सोईसुविधा युक्त सुलभ शौचालय उभारणी करण्यात येणार आहे. याबाबत प्रशासनाला आवश्यक तो प्रस्ताव तयार करण्या बाबत सूचना आमदार निलेश राणे यांनी केल्या आहेत. अन्य समस्या सोडवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु आहे.
एकूणच आमदार निलेश राणे यांनी समस्यांची पाहाणी करताच प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. जनतेच्या मागणीला प्राधान्य, काम करण्याची इच्छा सोबतच प्रशासनावर पकड असली की तात्काळ रिझल्ट मिळतोच हे आमदार निलेश राणे यांनी आमदारकीच्या पहिल्याच महिन्यात मतदारसंघातील अनेक जनहिताच्या समस्या सोडवून दाखवून दिले आहे. हे पाहता लोकप्रिय आमदार निलेश राणे यांची कामगिरी दमदार अश्याच प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत असल्याचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सांगितले आहे.