शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे ग्रामस्थांना आश्वासन.
मसुरे | प्रतिनिधी : वेरली गावाशी आपले अनेक वर्षे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. येथील ग्रामस्थ शब्दाला जागणारे असल्याने या गावावर कायमच आपले प्रेम राहणार आहे. ग्रामस्थांनी केलेला हा सत्कार आपण कायम स्मरणात ठेवणार. या गावच्या विकासासाठी आपण शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून सदैव कटिबद्ध राहू असे प्रतिपादन शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी वेरली येथे केले.
अनेक वर्षांची मागणी असलेल्या वेरली मुख्य रस्ता ते सातेरी मंदिर रस्ता खडीकरण, डांबरीकरण काम सामंत यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिल्याप्रमाणे पूर्ण केले. याबाबत ग्रामस्थांनी जत्रोत्सवानिमित्त सामंत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना दत्ता सामंत म्हणाले की खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, बंदर विकासमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गावातील उर्वरित विकासकामे प्राधान्याने पूर्ण करू.
यावेळी सरपंच धनंजय परब, माजी उपसभापती संजय उर्फ छोटू ठाकुर, तालुका महिला ओबीसी सेल अध्यक्ष पूजा वेरलकर, ग्रा. पं. सदस्य अनिल परब, पोलीस पाटील प्रमोद परब, भगवान परब, सदाशिव परब, दिगंबर परब, दत्ताराम परब, जितेंद्र परब, विरण सोसायटीचे चेअरमन रामदास पांजरी, अनिल बाबा परब, रघुनाथ परब, अरविंद परब, बाबू आंगणे, अनंत भोगले, प्रशांत परब, गणेश पालव आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन उर्फ बाबू आंगणे यांनी, तर प्रास्ताविक देवीदास वेरलकर यांनी केले.