शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे पिंगुळी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आवाहन.
आयोजकांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा सत्कार.
प्रतिनिधी : सध्याच्या घडणारे विविध प्रकारचे सामाजिक गुन्हे व अधःपतन याचे मूळ कारण बहुतांशी व्यसनाधिनता असल्याचे आपल्याला दिसून येते. सामाजिक वाटचाल करताना स्थिरता, एकाग्रता आणि अभ्यासपूर्ण शांती महत्वाची आहे तरच अपेक्षित विकास साधता येईल. त्यामुळे आजच्या काळाची प्लास्टीकमुक्ती सोबतच व्यसनमुक्ती ही गरज आहे. या मुद्द्यांकडे आपण सर्वांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पिंगुळी येथे केले. ग्रामपंचायत पिंगुळी, साईकला मंच व पिंगुळी ग्रामस्थ आयोजित पिंगुळी महोत्सवात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे प्रमुख मान्यवर म्हणून मंचावर उपस्थित होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी रुग्णवाहीकेसाठी ५० हजाराची देणगी दिली. या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.



या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह माजी जि. प. अध्यक्ष रणजीत देसाई, तहसीलदार वेसावकर, पोलिस निरीक्षक श्री. मगदूम, पद्मश्री परशुराम गंगावणे, अमित सामंत, विकास कुडाळकर, महोत्सव प्रमुख सरपंच अजय आकेरकर, साई कला मंचचे अध्यक्ष भूषण तेजम, उद्योजक गजानन कांदळगांवकर, बॅरीस्टर नाथ पै कुडाळ संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, पोलिस पाटील सतीश माडये, अमृता गाळवणकर, श्री मसके तसेच ग्रा पं सदस्य तसेच अन्य मान्यवर आणि पिंगुळी वासिय उपस्थित होते.