टोकयो | ब्यूरो न्यूज : एकेकाळी हाॅकी या क्रिडा प्रकाराचा बादशहा आणि ज्या देशाचा राष्ट्रीय खेळ हाॅकी अशा भारतीय हाॅकी संघाचा ऑलिंपिक पदकाचा दुष्काळ अखेर संपला आहे. टोकयो ऑलिंपिक 2020 स्पर्धेत भारताने जर्मनीला नमवत कांस्यपदकावर नांव कोरले आहे. गोलकीपर श्रीजेशने दाखविलेला अभेद्य बचाव आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने जर्मनीला ‘पाच विरुद्ध चार’ असे नमवले. संपूर्ण सामना चुरशीचा झाला पण गोलकीपर श्रीजेशचा बचाव हा भारतासाठी सामन्याचा खरा घटक म्हणता येईल. या विजयानंतर भारतीय क्रिडा जगताला आणि हाॅकीला पुन्हा एक झळाळी प्राप्त झाली आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -