मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातल्या भरड येथील श्री दत्त मंदिर येथे श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त १४ ते १६ डिसेंबर २०२४ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात १४ ला सायंकाळी पाच वाजता बाळू काजरेकर यांचे पुराणवाचन ५.३० वाजता ह. भ. प. मेधा शेवडे यांचे कीर्तन, ६.४५ वाजता श्री दत्त जन्म, सायंकाळी ७.४५ वाजता पालखी प्रदक्षिणा व आरती मंत्रपुष्प होईल. १५ ला सायंकाळी ७ वाजता बाळकृष्ण दशावतार नाट्य मंडळ यांचा दशावतारी नाट्य प्रयोग सादर होणार आहे. १६ ला सायंकाळी ७ वाजता सम्राज्ञी शेलार आईर नामांकित गोमंतकीय गायिका यांचा ‘दत्त गीती गावा’ हा शास्त्रीय उपशास्त्रीय अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.