शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रवक्ते मंदार केणी यांना प्रसिद्धी पत्राद्वारे टोला.
पत्रकार परीषदेत केणी यांनी विचारलेल्या महोत्सवाच्या प्रश्नाबाबत देखिल स्पष्ट केली भूमिका.
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांनी कामाचा धडाका काय असतो हे दाखवून दिले आहे त्यामुळे चिपी विमानसेवा पुन्हा सुरु होण्याबाबत तुम्ही काळजी करु नये आणि लवकरच तुम्हाला मुंबईला पाठवण्यासाठी विमानसेवा सुरु करण्यात येईल असा टोला शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्त्ते मंदार केणी यांना पत्रकार परीषदेत उठवलेल्या सवालांबाबत लगावला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रवक्ते मंदार केणी यांनी शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार निलेश राणे निवडून आल्यानंतर चिपी विमानसेवा तसेच मालवण महोत्सव याबाबत सवाल उठविले होते. त्याला शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे उत्तर दिले आहे.
राजा गावकर यांनी प्रसिद्धीपत्रात केणींना वाचाळवीर म्हणले असून मंदार केणी यांनी मालवणातली उरलीसुरली ठाकरे शिवसेना संपवायचा विडा उचलला आहे असे म्हणले आहे. केणींनी निवडणुकीदरम्यान ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांना बाजुला राखण्याचे काम केले होते असा आरोप राजा गावकर यांनी केला असून त्यासाठी माजी आमदार वैभव नाईक व त्यांची व्यापारी वृत्ती कारणीभूत असल्याचे प्रसिद्धीपत्रात म्हणले आहे.
पर्यटन महोत्सवाबाबतच्य राजा गावकर यांनी केणींना उत्तर दिले की, आपल्याकडे दिवाळी ते डिसेंबर दरम्यान पर्यटकांची गर्दी असते. एप्रिल व मे महिन्यात तो ओघ थोडा कमी होतो त्यामुळे त्यावेळी महोत्सवाचे आयोजन केले जाईल अशी भूमिका श्री. गावकर यांनी मांडताना, माजी आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकालात अशा किती महोत्सवांचे आयोजन केले होते असा प्रतिसवाल केणींना केला आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर प्रसिद्धीपत्रात म्हणले आहे की आपण कोणावर टीका करत आहोत याचे ताळतंत्र बाळगावे. निवडणुक व संबंधीत कालावधीत भरपूर टीका होऊन देखिल आपण शांत राहीलो पण यापुढे टीकेला उत्तर दिले जाईल असे राजा गावकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच येणाऱ्या काळात कशी आणि किती विकास कामे होतील हे पाहून तुमच्या तोंडच पाणी पळेल. आता फक्त उपोषण आणि आंदोलन या गोष्टी करण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही आणि ती उपोषण आणि आंदोलन ही सुद्धा तुम्ही न केलेल्या कामांसाठीच असतील असे शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी प्रसिद्धीपत्रात म्हणले आहे.