24.2 C
Mālvan
Thursday, December 12, 2024
IMG-20240531-WA0007

माजी आमदार वैभव नाईक यांचे ‘पत्र प्रत्युत्तर..!’

- Advertisement -
- Advertisement -

प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा विधानसभा निवडणूक २०२४ मधील पराभव झाल्या. यानंतर त्यांनी मिडियासमोर येत पराभव मान्य केला आणि प्रतिस्पर्धी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. या नंतर काही दिवसात सोशल मिडियावर एक पत्र व्हायरल झाले त्यात माजी आमदार वैभव नाईक हे चांगले आहेत पण त्यांचा राजकीय पक्ष चुकला म्हणून पराभव झाला अशी टीका केली गेली होती. त्या पत्राला उत्तर देताना वैभव नाईक म्हणतात की, आमदारकीच्या कार्यकाळात केलेल्या कामांची आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची आवर्जून जाणीव ठेवली यासाठी धन्यवाद. पण मला मत देताना तुम्हाला माझा पक्ष आडवा आला आणि त्यामुळे तुम्ही मला मतदान करू शकला नाहीत असा प्रति टोला वैभव नाईक यांनी लगावला आहे.

माजी आमदार वैभव नाईक पुढे म्हणतात की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा माझ्यासाठी माझे कुटुंब आहे. उद्धव ठाकरे हे माझे फक्त पक्षप्रमुख नसून ते माझ्यासाठी कुटुंबप्रमुख आहेत २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी माझ्यासारख्या एका ३४ वर्षाच्या तरुणाला राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांविरोधात कुडाळ – मालवण मतदारसंघाची उमेदवारीच दिली नसती तर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर माझा जन्म सुद्धा झाला नसता. माझा राजकीय प्रवास हा कणकवली नगरपंचायत क्षेत्रापुरता मर्यादित राहिला असता. त्या विधानसभा निवडणुकीत निकराची झुंज देऊनही माझा पराभव झाला तरीसुद्धा २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत उद्धवजीनी पुन्हा माझ्यावरच विश्वास दाखवला. त्यावेळी त्यांचा विश्वास सार्थ ठरवत मी महाराष्ट्राचा ‘जायंट किलर’ बनलो. माझ्या नावामागे ‘आमदार’ ही उपाधी लागली, ती उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षामुळे असे वैभव नाईक यांनी म्हणले आहे. दोन टर्म मिळालेल्या आमदारकीमध्ये तळागाळातील शिवसैनिकांनी मला निवडून आणण्यासाठी घेतलेले कठोर परिश्रम आहेत. त्यामुळे मला मतदान करताना आपल्याला माझा पक्ष आडवा येत असेल तर तो माझा नाईलाज आहे. हा पक्ष किंबहुना हे शिवसेना नावाचे कुटुंब मी शेवटच्या श्वासापर्यंत कधीही सोडणार नाही असेही प्रत्युत्तर वैभव नाईक यांनी दिले आहे.

त्या व्हायरल पत्रात माजी आमदार वैभव नाईक यांना कर्णाची उपमा दिली गेली होती त्याबद्दल वैभव नाईक म्हणतात की, कर्णाला युद्धाच्या निर्णायक क्षणी विद्येचे विस्मरण होईल हा शाप होता. रथाचे चाक युद्धभूमीवर अडकेल हा सुद्धा शाप होता. इंद्राने कपटकारस्थान करून कर्णाला जन्मतः मिळालेली कवचकुंडले काढून घेतली होती. अर्जुनाच्या रथाचे सारथ्य भगवान श्रीकृष्ण करीत होते आणि रथावर महाबली हनुमान विराजमान होते. आपल्या संभाव्य पराभवाची कर्णाला पूर्ण कल्पना होती तरीही तो रणांगणावर आपल्या प्रिय मित्रासाठी लढला आणि वीरगतीला प्राप्त झाला. कर्ण पहिला पांडव होता आणि त्यासाठीच श्रीकृष्णाने त्याला युधिष्ठिराऐवजी पुढचा सम्राट बनवण्याचे आमिष दाखवले होते. कर्णाने हे सगळे मोह आणि आमिषे झुगारून दिली कारण त्याला ‘अंगराज कर्ण’ बनवणारा त्याचा मित्र होता. तो मित्र त्याच्या आयुष्यात आला नसता तर आयुष्यभर कर्णाची हेटाळणी ‘सुतपुत्र कर्ण’ म्हणूनच झाली असती. शिवसेनेतील फुटीनंतर टू थर्ड बहुमत गाठण्यासाठी एक – एक आमदार महत्वाचा बनला होता. त्यावेळी मला गुवाहाटीला जाण्यासाठी पन्नास कोटींची ऑफर होती व एकनाथ शिंदेंचे आणि माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे गुवाहाटी गाठल्यानंतर कदाचित माझा मंत्रीमंडळात प्रवेश सुद्धा झाला असता. माझ्या राजकीय स्वार्थासाठी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी आणि मला निवडून देणाऱ्या जनतेशी बेईमानी करायची हे आपल्याला शक्य नाही याचा पुनुरुच्चार माजी आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले आहे. पत्रातील ‘जाज्वल्य हिंदुत्व जागरूक झाल्यामुळेच पराभव झाला’ या मुद्द्याचा आधार घेत वैभव नाईक यांनी विचारले की, कुडाळ – मालवण मतदारसंघातील ७३४८३ मतदारांनी माझ्यासाठी मतदान केले. यातील हिंदू मतदारांचे हिंदुत्व आपल्याला मान्यच नाही का?

माजी आमदार वैभव नाईक यांचा हा पत्र प्रत्युत्तर व्यवहार सध्या सोशल मिडियावर तथा त्यांच्या फेसबुक पेजवरही व्हायरल होत आहे. त्यातील ‘क्रमशः’ अशा उल्लेखा मुळे हा संवाद आणखी पुढे काही काळ चालत राहणार आहे असे चित्र सध्या दिसत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा विधानसभा निवडणूक २०२४ मधील पराभव झाल्या. यानंतर त्यांनी मिडियासमोर येत पराभव मान्य केला आणि प्रतिस्पर्धी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. या नंतर काही दिवसात सोशल मिडियावर एक पत्र व्हायरल झाले त्यात माजी आमदार वैभव नाईक हे चांगले आहेत पण त्यांचा राजकीय पक्ष चुकला म्हणून पराभव झाला अशी टीका केली गेली होती. त्या पत्राला उत्तर देताना वैभव नाईक म्हणतात की, आमदारकीच्या कार्यकाळात केलेल्या कामांची आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची आवर्जून जाणीव ठेवली यासाठी धन्यवाद. पण मला मत देताना तुम्हाला माझा पक्ष आडवा आला आणि त्यामुळे तुम्ही मला मतदान करू शकला नाहीत असा प्रति टोला वैभव नाईक यांनी लगावला आहे.

माजी आमदार वैभव नाईक पुढे म्हणतात की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा माझ्यासाठी माझे कुटुंब आहे. उद्धव ठाकरे हे माझे फक्त पक्षप्रमुख नसून ते माझ्यासाठी कुटुंबप्रमुख आहेत २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी माझ्यासारख्या एका ३४ वर्षाच्या तरुणाला राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांविरोधात कुडाळ - मालवण मतदारसंघाची उमेदवारीच दिली नसती तर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर माझा जन्म सुद्धा झाला नसता. माझा राजकीय प्रवास हा कणकवली नगरपंचायत क्षेत्रापुरता मर्यादित राहिला असता. त्या विधानसभा निवडणुकीत निकराची झुंज देऊनही माझा पराभव झाला तरीसुद्धा २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत उद्धवजीनी पुन्हा माझ्यावरच विश्वास दाखवला. त्यावेळी त्यांचा विश्वास सार्थ ठरवत मी महाराष्ट्राचा 'जायंट किलर' बनलो. माझ्या नावामागे 'आमदार' ही उपाधी लागली, ती उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षामुळे असे वैभव नाईक यांनी म्हणले आहे. दोन टर्म मिळालेल्या आमदारकीमध्ये तळागाळातील शिवसैनिकांनी मला निवडून आणण्यासाठी घेतलेले कठोर परिश्रम आहेत. त्यामुळे मला मतदान करताना आपल्याला माझा पक्ष आडवा येत असेल तर तो माझा नाईलाज आहे. हा पक्ष किंबहुना हे शिवसेना नावाचे कुटुंब मी शेवटच्या श्वासापर्यंत कधीही सोडणार नाही असेही प्रत्युत्तर वैभव नाईक यांनी दिले आहे.

त्या व्हायरल पत्रात माजी आमदार वैभव नाईक यांना कर्णाची उपमा दिली गेली होती त्याबद्दल वैभव नाईक म्हणतात की, कर्णाला युद्धाच्या निर्णायक क्षणी विद्येचे विस्मरण होईल हा शाप होता. रथाचे चाक युद्धभूमीवर अडकेल हा सुद्धा शाप होता. इंद्राने कपटकारस्थान करून कर्णाला जन्मतः मिळालेली कवचकुंडले काढून घेतली होती. अर्जुनाच्या रथाचे सारथ्य भगवान श्रीकृष्ण करीत होते आणि रथावर महाबली हनुमान विराजमान होते. आपल्या संभाव्य पराभवाची कर्णाला पूर्ण कल्पना होती तरीही तो रणांगणावर आपल्या प्रिय मित्रासाठी लढला आणि वीरगतीला प्राप्त झाला. कर्ण पहिला पांडव होता आणि त्यासाठीच श्रीकृष्णाने त्याला युधिष्ठिराऐवजी पुढचा सम्राट बनवण्याचे आमिष दाखवले होते. कर्णाने हे सगळे मोह आणि आमिषे झुगारून दिली कारण त्याला 'अंगराज कर्ण' बनवणारा त्याचा मित्र होता. तो मित्र त्याच्या आयुष्यात आला नसता तर आयुष्यभर कर्णाची हेटाळणी 'सुतपुत्र कर्ण' म्हणूनच झाली असती. शिवसेनेतील फुटीनंतर टू थर्ड बहुमत गाठण्यासाठी एक - एक आमदार महत्वाचा बनला होता. त्यावेळी मला गुवाहाटीला जाण्यासाठी पन्नास कोटींची ऑफर होती व एकनाथ शिंदेंचे आणि माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे गुवाहाटी गाठल्यानंतर कदाचित माझा मंत्रीमंडळात प्रवेश सुद्धा झाला असता. माझ्या राजकीय स्वार्थासाठी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी आणि मला निवडून देणाऱ्या जनतेशी बेईमानी करायची हे आपल्याला शक्य नाही याचा पुनुरुच्चार माजी आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले आहे. पत्रातील 'जाज्वल्य हिंदुत्व जागरूक झाल्यामुळेच पराभव झाला' या मुद्द्याचा आधार घेत वैभव नाईक यांनी विचारले की, कुडाळ - मालवण मतदारसंघातील ७३४८३ मतदारांनी माझ्यासाठी मतदान केले. यातील हिंदू मतदारांचे हिंदुत्व आपल्याला मान्यच नाही का?

माजी आमदार वैभव नाईक यांचा हा पत्र प्रत्युत्तर व्यवहार सध्या सोशल मिडियावर तथा त्यांच्या फेसबुक पेजवरही व्हायरल होत आहे. त्यातील 'क्रमशः' अशा उल्लेखा मुळे हा संवाद आणखी पुढे काही काळ चालत राहणार आहे असे चित्र सध्या दिसत आहे.

error: Content is protected !!