कुडाळ | ब्यूरो न्यूज : कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील श्री. कलेश्वर विद्यामंदिर हायस्कूल व प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभ मंगळवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.
यावेळी संस्था अध्यक्ष कमलाकर नाईक, मुख्याध्यापक श्रीम. नाईक मॅडम, माजी सरपंच शेखर गावडे, नेरूर सरपंच भक्ती घाडीगावकर, उपसरपंच दत्ता म्हाडदळकर, ग्रा. प. सदस्य मंजुनाथ फडके, रोशनी नाईक, शंभू नाईक, शालेय समिती अध्यक्ष बाळा नाईक, माजी देवस्थान कमिटी अध्यक्ष प्रदीप नाईक, सौ. सडवेलकर यांसह शिक्षक शिक्षकेतर कमर्चारी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.