मसुरे | प्रतिनिधी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी माता अशी सर्वदूर ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव २२ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहे.
आज गुरुवारी १२ डिसेंबर २०२४ रोजी श्री भराडी देवी यात्रेच्या तारीखेची निश्चिती झाल्याची माहिती आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांनी दिली.