26.9 C
Mālvan
Wednesday, December 11, 2024
IMG-20240531-WA0007

मालवणात १५० मुलांचे सामूहीक गीता वाचन.

- Advertisement -
- Advertisement -

विश्व हिंदू परीषद मालवण प्रखंडच्या वतीने ५१६१ व्या गीता जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रम.

व्याख्याते श्रीधर काळे व प्रभूदास आजगांवकर यांचे गीता आचरणाबाबत मार्गदर्शन.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात विश्व हिंदू परीषद, मालवण प्रखंडच्या वतीने, ५१६१ व्या गीता जयंती निमित्त कन्या शाळा, मालवण प्रशालेच्या पहिली ते सातवीच्या १५० विद्यार्थ्यांचा सामूहीक गीता वाचन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. श्रीधर काळे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा व्याख्याते होते तर सत्संग आयामाचे प्रमुख प्रभूदास आजगांवकर आणि विश्व हिंदू परीषद, मालवण प्रखंड अध्यक्ष श्री. भाऊ सामंत यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. मालवण मधील कन्या शाळा प्रशालेच्या कै. गंगूबाई कृष्णराव देसाई सभागृह येथे हा विशेष उपक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमात सुरवातीला प्रभू श्रीकृष्ण प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक तथा विश्व हिंदू परीषद मालवण प्रखंडचे अध्यक्ष श्री. भाऊ सामंत यांनी मंचावरील श्री. श्रीधर काळे व श्री. प्रभूदास आजगांवकर आणि उपस्थित सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी विश्व हिंदू परीषद, मालवणच्या उपक्रमांचा व उद्देशांचा थोडक्यात आढावा घेतला.

श्री. प्रभूदास आजगांवकर यांनी त्यांच्या प्रास्ताविकात विश्व हिंदू परीषदेच्या सत्संग आयामा अंतर्गत गीता वाचन कार्यक्रमाची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन करताना सांगितले की गीता ही जीवनातील सर्व समस्यांचे समाधान आहे. जे उपाय गुगलमध्येही सापडणार नाहीत ते आपल्याला गीतेमध्ये सापडतील. गीतेचे वाचन, पठण याचसोबत तिचे आचरण करणे हे महत्वाचे आहे. प्रभूदास आजगांवकर यांनी सर्वांना सुस्वर लयीमध्ये गीतेच्या अध्यायांचे वाचन मार्गदर्शन केले.

श्री. श्रीधर काळे ( अध्यक्ष तथा प्रमुख व्याख्याते )

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. श्रीधर काळे यांनी मार्गदर्शन करताना गीतेची महती सांगितली. संत श्री ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक यांनी गीतेचे महत्व जाणले आणि समाज घडविण्याच्या दृष्टीने गीतेतील संदेशांना सुलभपणे सामन्य लोकांपर्यंत पोहोचवले. मानवाचे संपूर्ण जीवन सुखकर होण्यासाठी गीतेचे नियमित वाचन, पठण व आचरण याचा त्यांनी विद्यार्थ्यांना आग्रह केला. कार्यक्रमाचा समारोपाला मालवणचे सुप्रसिद्ध उद्योजक श्री भूषण साटम यांनी पसायदान सादर केले.

श्री. प्रभूदास आजगांवकर ( गीता मार्गदर्शक, सत्संग आयाम प्रमुख)

या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते श्रीधर काळे, विश्व हिंदू परीषद मालवण प्रखंडचे अध्यक्ष श्री भाऊ सामंत, सत्संग आयाम प्रमुख व कीर्तनकार शिक्षक प्रभूदास आजगांवकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मालवण तालुका कार्यवाह श्री. रत्नाकर कोळंबकर, उद्योजक श्री. भूषण साटम, सनातन संस्था मालवणचे अरविंद मयेकर, विश्व हिंदू परीषदेचे कार्यकर्ते श्री. जयराम उर्फ बबन परुळेकर तसेच कन्या शाळा प्रशालेच्या शिक्षिका सौ. करलकर, सौ. गोसावी, सौ. चव्हाण, सौ. राऊळ व सौ. गार्गी कुशे व शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रशालेची १५० मुलं उपस्थित होती.

श्री. भाऊ सामंत ( अध्यक्ष, विश्व हिंदू परीषद मालवण प्रखंड.)

आधुनिक युगात भौतिक सुखाच्या गजबजाटात शालेय मुलांचे चित्त स्थीर राहून बौद्धिक विकासासाठी गीता वाचनाच्या माध्यमातून या मार्गदर्शन कार्यक्रमाचा शालेय मुलांना फायदा होऊन त्यांचे जीवन समतोल राहण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

विश्व हिंदू परीषद मालवण प्रखंडचे प्रमुख श्री भाऊ सामंत यांनी आभार प्रदर्शन केले आणि सर्व शालेय मुलांची विशेष प्रशंसा करुन त्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!