भाजपा शहराध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व सहकारी यांनी केली एस टी स्टॅन्डची पहाणी व दिल्या सूचना.
नवीन इमारत लवकरच प्रवांशांच्या सोयीसाठी होणार उपलब्ध.
मालवण | प्रतिनिधी : नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनंतर मालवण एस टी स टॅन्डच्या इमारत बांधकामाला गती मिळाली आहे. आज २८ नोव्हेंबर रोजी भाजपाचे शहर अध्यक्ष बाबा मोंडकर व माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व सहकारी यांनी एस टीचे अधिकारी, ठेकेदार यांची भेट घेऊन इमारतीची पहाणी केली व सूचना दिल्या. या इमारतीतील शौचालय व अन्य सुविधांबाबत सूचना दिल्या गेल्या.
यावेळी बोलताना भाजपा शहराध्यक्ष बाबा मोंडकर म्हणाले की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीत २०१९ कालावधीत भाजपाच्या माध्यमातून या इमारतीसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु मागील पाच आमदार वैभव नाईक यांनी फक्त ठेकेदारी हिशेबाने काम केली. त्यांनी ठेकेदारासोबत स्वतःची आर्थिक गणिते करुन पुढे एस टी स्टॅन्ड इमारत पूर्ण केले नाही. परंतु आता आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनंतर व या पहाणीनंतर डिसेंबर अखेर एस टी स्टॅन्ड इमारतीचे लोकार्पण संबंधी तशा सूचना दिल्या गेल्या आहेत. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक जगदीश गांवकर, ललित चव्हाण, संदीप मालंडकर, दादा वाघ, कमलेश कोचरेकर, नंदू देसाई, राजेश बोडके व एस टी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
महायुतीचे आमदार निलेश राणे यांच्या निवडणूक विजयानंतर अवघ्या काही दिवसात मालवण एस टी स्टॅन्डच्या रखडलेल्या कामाला वेग येऊन त्याचे लोकार्पण होणार असल्याच्या भाजपा शहराध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व सहकारी यांच्या माहितीमुळे, लवकरच एस टी प्रवाशांची गैरसोय दूर होईल अशी आशा व्यक्त होत आहे.