आचरा | प्रतिनिधी : जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आचरा येथे स्वागत व सत्कार करण्यात आले. यावेळी आचरा सरपंच जेरान फर्नांडिस यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत तालुकाध्यक्ष महेश राणे, निलिमा सावंत, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, डॉ. प्रमोद कोळंबकर, जयप्रकाश परुळेकर, चावल मुजावर, सचिन हडकर, अवधूत हळदणकर,भाऊ हडकर, उदय घाडी, दत्ता वराडकर,रुपेश हडकर, महेंद्र घाडी, अभिजीत सावंत, चंदू कदम,श्रीपाद सावंत, सुनील आचरेकर, अजित घाडी, किशोर आचरेकर,अनिकेत घाडी, सारंग, ऋषी मेस्त्री, संदेश मेस्त्री,यश राणे, चैतन्य कांबळी यांसह बहुसंख्य ग्रामस्थ, शिवसैनिक आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार निलेश राणे यांच्या विजयाने, जवळपास १० वर्षे आमदारकी असलेल्या वैभव नाईक यांची आमदारकी संपुष्टात येण्यास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची महत्वपूर्ण भूमिका असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.